Tarun Bharat

तक्रारदाराची नगरविकास विभागाच्या सचिवांकडे तक्रार

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेतील आरोग्य विभागात सगळाचा सावळा गोंधळ सुरु आहे. तेथील तीन कर्मचाऱयांवर लाच घेतल्याचा गुन्हा आहे. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येवू नये, अशी तक्रारदार असलेले अमित शिंदे यांनीच राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केलेली आहे.

त्यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, सातारा नगरपालिकेत दि. 8 जून 2020 पावणे दोन वाजण्याच्या सुमारास उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, गणेश टोपे, प्रवीण यादव, राजेंद्र कायगुडे हे अधिकाऱयांनी आरोग्य विभागाच्या कचरा टेंडरमधील डिपॉझिट मागणी संदर्भात 2 लाख 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावरुन लाच लुचपत विभागाकडे तक्ररार केली होती. त्या विभागाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ही घटना न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत आरोग्य निरीक्षकांना  पालिकेच्या सेवेत रुजू करुन घेवू नये, अशी तक्रार करण्यात आली आहे. तसेच त्या सुनावणीकरता व या प्रकरणी चौकशी समिती आली खरी परंतु त्या समितीने योग्य ती चौकशी न करता तक्रारदाराकडून पुरावे घेण्याऐवजी तक्रारादारांवरच पावशेर ठेवण्याचा प्रकार सुरु होता. त्यामुळे अशा प्रकारामुळे राज्याच्या वरीष्ठ पातळीपासून भ्रष्टाचाराची किड लागली असून यामध्ये चौकशी अधिकारी होते तेही नेमके कशाला भुलले गेले आहेत. असेच भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्यांच्या बाजूने विचार करणार असतील तर तक्रारदार तक्रारच करणार नाहीत. त्याकरता शासनाने चौकशी समिती नेमताना स्वच्छ अशा पारदर्शक अशा अधिकाऱयांची नेमणूक केली तर या व्यवस्थेवर विश्वास बसेल, असेही म्हटले आहे.

Related Stories

वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; 30 लाखांच्या खंडणीची मागणी

datta jadhav

ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी; शाळा, चित्रपटगृहे बंद

Abhijeet Khandekar

लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

Kalyani Amanagi

वाई आगारात डिझेलचा तुटवडा

Patil_p

१२ मे ला पुण्यात जाहीर करणार दिशा:संभाजीराजे

Rahul Gadkar

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदत

Archana Banage