Tarun Bharat

तडसर येथे दोन नवीन धान्य गोदामे होणार : राज्यमंत्री विश्वजीत कदम

कडेगाव प्रतिनिधी

कडेगांव तालुक्यातील तडसर येथे प्रत्येकी १०८० मे.टन दोन नवीन धान्य गोदामांच्या उभारणीसाठी शासन स्तरावर मान्यता देण्याबाबत आज विधान भवन येथील दालनात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

कडेगांव तालुक्यातील रेशन धान्य दुकानांमध्ये पुरवठा करण्यात येणारे रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येते. मात्र तेथे साठवणूक करण्यासाठी गोदामा अभावी अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे जवळपासच्या इतर तालुक्यामधुन पुरवठा करणे आवश्यक झाले होते. तथापि नवीन दोन गोडाऊन बांधकामामुळे तालुक्यातच धान्य साठवणूक होण्यास मदत होईल असे डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

या वेळी नवीन शासकीय धान्य गोदाम उभारणीसाठी आवश्यक त्या बाबींवर संबंधीत विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने आठ कोटीचे अंदाजपत्र सादर केले असून त्यास तातडीने मान्यता देण्याचे निर्देश डॉ.विश्वजीत कदम यांनी दिले.

तडसर येथील दोन नवीन गोडावूनची मुख्य इमारत, सुरक्षा रक्षक केबिन, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, विद्युतीकरण, पाणी पुरवठा, कुपनलिका, मैदान सपाटीकरण आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी यावेळी दिली. बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सह सचिव .सुधीर तुंगार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ.संपत डावखर, सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी .आशिष बारकुळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, राम पाटील, कार्यासन अधिकारी, श्री.राजेंद्र सोनावणे आदी सह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

भारतात कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट

datta jadhav

मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट

Archana Banage

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्‍सी गायब

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

केंद्राकडून पुन्हा ‘आरसीईपी’ कराराचा घाट : राजू शेट्टी 

Archana Banage

दिल्ली : नववी, अकरावीची परीक्षा रद्द; शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती

Tousif Mujawar