Tarun Bharat

तपास होत नाही की चोरटे सापडत नाहीत

तीन वर्षात तब्बल 200 ट्रान्सफॉर्म चोरीच्या घटना-एकाही गुन्हयाचा नाही छडा

प्रतिनिधी/ गोडोली

जिह्यात ट्रान्सफॉर्म चोरीच्या तीन वर्षात तब्बल 200 घटना घडल्या असून त्यात महावितरणचे सुमारे अडीच कोटीचे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांकडे सर्व चोरीच्या तक्रार दाखल करून अद्याप एकाही घटनेचा छडा लावण्यात पोलिसांने यश आले नाही. ट्रान्सफॉर्म चोरीला गेल्यावर त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱयांचे अतोनात नुकसान होत असून चोरटे सापडत नसल्याने तपास होत नाही की चोरटे सापडत नाहीत, याबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे.

जिह्यातील ग्रामीण भागातील निर्जन स्थळी असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्म चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चार वर्षात तब्बल 200 ठिकाणचे ट्रान्सफॉर्म चोरीला गेले असून त्याची वेळोवेळी पोलिसात तक्रार दाखल केल्या आहेत. मात्र एका ही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे चोरी केल्यावर काहीच कारवाई होत नसल्याने भयमुक्त चोरटय़ांकडून सतत ट्रान्सफॉर्मच्या चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. 

सातारा विभागांर्तत सातारा रोड, शिवथर, वडूथ, आरळे या परिसरात गेल्या एका महिन्यात 22 केव्ही व्होल्टेज लेव्हलचे 100 केव्हीएचे जवळपास 20 ट्रान्सफॉर्म चोरीला गेले आहेत. यांनी पोलिसात तक्रार दाखल देवून ही अद्याप चोरटय़ांच्या टोळीचा छडा लावण्यात यश आले नाही. ट्रान्सफॉर्म चोरीमुळे महावितरणचे सुमारे अडीच कोटीचे तर शेतकऱयांचे कोटय़ावधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 2016 पुर्वी अशा चोऱया करणाऱया काही चोरटय़ांना पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतरच्या काळात 200 ट्रान्सफॉर्मची चोरी होऊन ही छडा लागल नसल्याने तपास होत नाही की चोरटे सापडत नाहीत, असा संशयाची चर्चा होऊ लागली आहे. राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रणजित फाळके यांनी जिल्हा पालीस अधिक्षकांना ट्रान्सफॉर्म चोरटय़ांच्या टोळीचा छडा लावण्यासाठी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असून फेडरेशन आता उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

तीन वर्षात तब्बल 200 हून अधिक ट्रान्सफॉर्म चोरीच्या घटना घडून एक ही आरोपी सापडलेला नाही. एका बाजूला महावितरणचे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱयांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसऱया बाजूला पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह आणि संशय व्यक्त होऊ लागला आहे.

Related Stories

बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

Patil_p

तब्बल दिड वर्षाने दुकाने 10 पर्यंत खुली

Patil_p

सोलापूर : लालपरी सुरू पण प्रवाशांच्या विना

Archana Banage

सहय़ाद्रि कारखान्यावर जिल्हा बँकेची खलबते

Patil_p

व्यापारी संघटनांनी स्वतः नियोजन करावे- जिल्हाधिकारी

Archana Banage

बीपी,शुगरअसणाऱ्या आशा सेविका कोरोना सर्व्हेत

Archana Banage