Tarun Bharat

तबलिगीच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी करणार

परदेशातील देणग्यांचा स्रोत तपासणार : अधिकाऱयांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तबलिगी जमाती मरकजला परदेशातून मिळालेल्या देणग्यांची चौकशी सीबीआय करणार आहे. परदेशी देणग्यांची माहिती लपवण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून एफआयरही नोंदवण्यात आला आहे. सीबीआय जमातीच्या सर्व दैनंदिन व्यवहार, खर्च, मिळकतीची तपासणी आणि चौकशी करणार आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीसाठी अद्याप कोणाही पथक अथवा अधिकाऱयाची नियुक्ती केलेली नाही. एका तक्रारीच्या आधारे प्राथमिक चौकशीची एफआयआर नेंद केली आहे. जमातच्या आयोजकांनी अवैध आणि अनुचित पद्धतीने रोकड व्यवहार केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर जमात मरकजला परदेशातूनही देणग्या मिळाल्या आहेत. मात्र आयोजकांनी त्याचा खुलासा सक्षम अधिकाऱयांपुढे केलेला नाही. परदेश देणगी अधिनियमानुसार ही माहिती देणे आयोजकांना बंधनकारक असतानाही त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयने प्राथमिक तपासणी अर्ज दाखल केल्यानंतर तबलिगी जमातीच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यास तसेच तपास करण्यात सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांसह विविध विभागांकडून याविषयीची माहिती, रेकॉर्ड जमा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच विविध विभागांना त्यासंबंधी पत्रेही देण्यात आली आहेत. याची सविस्तर चौकशीही होऊ शकते.

दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात तबलिगी जमातीच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे आणि ते लपवल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी देशाच्या अनेक भागात संचार केल्याने सर्वत्र कोरोना पसरवल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर माध्यमांमध्ये तो एक महत्त्वाचा विषय बनला होता.

294 परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र

दरम्यान, दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरित्या धर्म प्रसाराच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी होणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 294 परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्वजण मलेशिया, थायलंड, बांगलादेश तसेच अनेक आफ्रिकी देशातून आले आहेत. याआधीही 82 नागरिकांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे.

Related Stories

जेईई मेन, ‘नीट’ परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होणार

Patil_p

निघाली मोबाईलची वरात…

Patil_p

जम्मू-काश्मीर : सर्व सरकारी कार्यालयांवर फडकणार राष्ट्रध्वज

datta jadhav

टोकियोमध्ये आणीबाणी लागू; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार ऑलिम्पिक स्पर्धा

Archana Banage

गुजरातचे मुख्यमंत्री होमक्वारंटाईन

Patil_p

राहुल गांधींनी फडकविला चारमिनारसमोर तिरंगा

Patil_p