Tarun Bharat

तब्बल दहा गोलांच्या सामन्यांत ओडिशाची ईस्ट बंगालवर 6-4 अशी मात

ISL 2021 – 22
Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

काल वास्कोतील टिळक मैदानावर ओडिशा एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यातील लढतीत उभय संघांकडून तब्बल दहा गोल नोंदविण्यात आले. यातील पाच गोल तर खेळातील शेवटच्या दहा मिनिटात झाले. या सामन्यात ओडिशाने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना एससी ईस्ट बंगालचा 6-4 गोलानी पराभव केला.

ओडिशा एफसीचा संघ मध्यंतराला 3-1 गोलानी आघाडीवर होता. ओडिशा एफसीसाठी हॅक्टर रोडास रॅमेरीज आणि आरिदाय सुवारेझने प्रत्येकी दोन तर झावी हर्नांडिझ व इसाक वानलालरुआतफॅलाने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत ईस्ट बंगालसाठी डॅनियल चूकवूने दोन तर सँबोय हावकीप व डॅरन सिडॉएलने प्रत्येकी एक गोल केला. या विजयाने ओडिशा एफसीला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता दोन सामन्यांतून 6 तर एससी ईस्ट बंगालचे तीन सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे.

सामन्याच्या तेराव्याच मिनिटाला राजू गायकवाडने केलेल्या थ्रोईनवर ताबा मिळवित ईस्ट बंगालच्या डॅरन सिडॉएलने ओडिशाचा गोरलक्षक कमलजीत सिंगला भेदले व आघाडी घेतली. त्यानंतर 33व्या मिनिटाला ओडिशा एफसीच्या हॅक्टर रोडास रॅमेरीजने झेवियर हर्नांडिझच्या चालीवर गोल करून बरोबरी साधली. 40व्या मिनिटाला परत एकदा झेवियर हर्नांडिझच्या पासवर हॅक्टर रोडास रॅमेरीजने ओडिशाचा दुसरा तर मध्यंतराच्या ठोक्याला झेवियर हर्नांडिझने तिसरा गोल करून संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱया सत्रात सहा गोल नोंदविण्यात आले. प्रथम 71व्या मिनिटाला ओडिशाच्या आरिदाय सुवारेझने गोल करून संघाची आघाडी 4-1 अशी केल्यानंतर 80व्या मिनिटाला एससी ईस्ट बंगालच्या सँबोय हावकीपने गोल करून सामना 4-2 असा आणला. त्यानंतर ओडिशाच्या इसाक वानलालरुआतफॅलाने संघाचा पाचवा गोल केला. या गोलनंतर डॅनियल चुकवूने ईस्ट बंगालसाठी लागोपाठ दोन गोल करून (5-4) सामन्यात रंगत आणली. मात्र शेवटच्या मिनिटाला आरिदाय सुवारेझने जॉनाथन ख्रिस्टियानच्या पासवर गोल करून ओडिशा एफसीला 6-4 असा विजय मिळवून दिला.

Related Stories

मडगाव रवींद्र भवनमध्ये आज ‘उटा’च्या नवीन समितीची स्थापना

Amit Kulkarni

निरंकाल येथील जीर्ण झाडामुळे धोका

Amit Kulkarni

भाजपा महिला मोर्चा उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षपदी गीता कदम बिनविरोध

Amit Kulkarni

अदानींच्या फायद्यासाठी गोव्याच्या नैसर्गिक स्रोतांचा बळी

Patil_p

एजींच्या सल्ल्यानंतर निवडणुकीचा फैसला

Patil_p

काडतुसांच्या बॅगेमुळे पोलिसांची तारांबळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!