Tarun Bharat

तब्बल दहा दिवसांनी ‘या’ चार आगरातून धावली एसटी

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेल्या अकरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एसटीची सेवा ठप्प झाली आहे. मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यातील चार आगारांमधून तब्बल अकरा दिवसांनंतर एसटी धावली. त्याला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड, गडहिंग्लज, इचलकंजी आणि गगनबावडा या आगारातून एसटी धावली. त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या 27 ऑक्टोबर पासून बेमुदत संप सुरू आहे. तर आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर गेल्या अकरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच आगारातले कामकाज ठप्प करून बेमुदत संपात सहभाग नोंदवला. तब्बल अकरा दिवस जिल्ह्यात एसटीची एकही फेरी झाली नव्हती. या अकरा दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास पाच हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्याचा परिणाम म्हणून जवळपास सात कोटींचा फटका कोल्हापूर विभागाला बसला. आज आंदोलनाच्या अकराव्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील चार आगारांमधून एसटी धावली. तब्बल अकरा दिवसांनंतर एसटी रस्त्यावर धावल्याने प्रवाशांनी देखील त्याला प्रतिसाद दिल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. आज कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज आगारामधून गडहिंग्लज-हिटण, कुरुंदवाड आगारामधून कुरुंदवाड-जयसिंगपूर व गगनबावडा आगारामधून गगनबावडा-जरगी या मार्गावर एसटी धावली.

Related Stories

Kolhapur Election 2022 : शाहूवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, गावात निरव शांतता

Archana Banage

कोल्हापूर : बच्चे सावार्डेत विहरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

कबनूरमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Archana Banage

कारवाईची भिती घालून 25 लाखांच्या लाचेची मागणी

Abhijeet Khandekar

हीच वेळ हद्दवाढीची!

Archana Banage