Tarun Bharat

तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य लोकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, भाज्यांनंतर आता काडीपेट्यांच्या किमती वाढणार आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढल्या आहेत. याआधी २००७ साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती.

कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात आल्याचे उद्योगाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, १ डिसेंबरपासून काडीपेट्यांची किंमत एक रुपयांनी वाढेल. काडीपेट्यांची नवीन किंमत एक रुपयाने वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या बैठकीत घेण्यात आला. पाच प्रमुख मॅचबॉक्स उद्योग संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होते. काडीपेट्यांची किंमत वाढवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला आहे.

दरम्यान, कच्च्या मालाच्या किमतीत अलीकडे चांगलीच वाढ झाली आहे. मॅच तयार करण्यासाठी जवळपास १४ कच्च्या मालाची गरज भासते. एक किलो लाल फॉस्फरसची किंमत ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच मेणाची पेटी ५८ रुपयांवरून ८० रुपये, बाहेरची पेटी ३६ रुपयांवरून ५५ रुपये आतील पेटीची फळी ३२ रुपयांवरून ५८ रुपयांची झाली आहे. कागद, स्प्लिंट, पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून वाढल्या आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतींनीही या भारात भर पडली आहे. यामुळे ही दरवाढ करण्यात येणार आहे.Related Stories

दिल्ली हिंसा : आरोपपत्रात येचुरींचे नाव

Patil_p

बिगरमुस्लीम शरणार्थींची यादी तयार

Patil_p

मोठी बातमी : राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार- राजेश टोपे

Abhijeet Shinde

‘जवाद’चा आंध्र, ओडिशाला धोका

Amit Kulkarni

निकृष्ट बियाणे प्रकरणी सखोल चौकशी करून मदत दिली जाणार : कृषीमंत्री

Abhijeet Khandekar

अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ कारणामुळं तरुणीनं सोडलं घर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!