Tarun Bharat

तमनार प्रकल्पाचा नवा मार्ग सर्वोच न्यायालयाने फेटाळला

जुन्या मार्गावरूनच वीजवाहिनी नेण्याचा आदेश

प्रतिनिधी /पणजी

कर्नाटकमधून गोव्यात 440 केव्हीची नवी वीजवाहिनी तमनार प्रकल्पासाठी येणार होती. त्यासाठी 1700 झाडे कापण्यात येणार होती. पण हा नवा मार्ग फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या मार्गालाच मान्यता दिली आहे.

मध्यप्रदेश तमनार या ठिकाणाहून गोव्यात वीजवाहिनी आणली जाणार आहे. ही 440 केव्ही उच्च दाबाची वीजवाहिनी कर्नाटकमार्गे गोव्यात येणार असून धारबांदोडा येथे वीज केंद्र बनणार आहे.

दक्षिण ग्रीडमधून सध्या गोव्याला 220 केव्ही वीजपुरवठा होतो. त्यासाठी जी वीजवाहिनी आहे. त्या वाहिनीच्या मार्गावरूनच ही तम्नार वीजवाहिनी नेल्यास झाडांची कत्तल करावी लागणार नाही. असा अहवाल केंद्रीय उच्चस्तरीय समिती (सीईसी) ने दिला होता.

त्याच मार्गावरून अति उच्चदाबाची वीज नेणे धोक्याचे असल्याचे जाहीर करून नवा समांतर मार्ग तयार केल्यास नव्या प्रकल्पाचे काम करणे सोपे होईल. तांत्रिक अडचणी दूर ठेवायच्या असतील तर त्याला नवा मार्गच योग्य आहे. त्यासाठी झाडे कापली गेली तरी नवी झाडे दुपटीने लावता येतील, असे सरकारचे मत होते.

सरकारला पर्यावरणाचे काहीच पडले नसल्याच आरोप करून गोवा फाऊंडेशनने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मांडला आणि केंद्रीय उच्चाधिकार समिती अहवाल सादर केला. या अहवालात जुन्या मार्गाची शिफारस केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. मोले अभयारण्याचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी बाजू मांडण्यात आली. विद्यमान वीजवाहिनीच्या मार्गावरून 440 केव्ही वाहिनी नेणे हे तांत्रिक काम पाहणे अभियंत्यांचे कसब असून जुन्या मार्गावरूनच तम्नार वीजवाहिनी नेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

Related Stories

गोव्यात संगीत शिक्षणासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात

Patil_p

एसआयटीला आणखी स्टाफची गरज

Amit Kulkarni

रोगप्रतिकारकशक्तीसाठी गुळवेलचा वाढला वापर

Omkar B

मुरगाव पालिकेने मांगोहिलमधील विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवली, माल व साहित्यही जप्त

Amit Kulkarni

बिष्णोई ग्रुप तर्फे ‘नेक्सा’ची उपकरणे गोव्याच्या बाजारपेठेत

Patil_p

नागेश संस्थानच्या कार्याची आमदार ढवळीकरांकडून प्रशंसा

Omkar B