Tarun Bharat

तरवळे क्लबचा सत्कार सोहळा, पारितोषिक वितरण लांबणीवर

फोंडा: तरवळे स्पोर्ट्स क्लबतर्फे 4 रोजी आयोजित करण्यात आलेला सत्कार सोहळा व क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवड झाल्यामुळे तरवळेचा सुयश प्रभुदेसाई यांचा तसेच तरवळे क्लबतर्फे खेळलेल्या माजी क्रिकेट खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

तरवळे क्लबने नुकतीच आयोजित केलेल्या स्व. डॉ. गोपीनाथ प्रभू सावकर चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात येणार होते. संबंधीतानी याची नोंद घ्यावी. पुढील तारीख जाहीर करण्यात येईल असे क्लबचे अध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी कळविले आहे.

Related Stories

मांद्रेत पार्सेकर, सोपटेंकडून एकाचदिवशी कार्यक्रमाचे आयोजन

Patil_p

मुरगावात पालिका निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी, राखीवतेमुळे सुप्त भिती आणि चिंताही, मात्र, काहींचा उघडपणे प्रचार

Amit Kulkarni

कुडचडे नगराध्यक्षपदासाठी प्रमोद नाईक यांचा अर्ज सादर

Amit Kulkarni

पाज-शिरोडा गावाला चिंता पाणी टंचाईची

Omkar B

राजधानी पणजीसमोर धोक्याची घंटा

tarunbharat

डिचोलीत कोवीड केअर सेंटर व स्टेप अप इस्पितळ

Amit Kulkarni