Tarun Bharat

‘तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर’ ग्रंथाचे मंगळवारी सांगलीत प्रकाशन

प्रतिनिधी / सांगली

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मानवी मूल्यांसाठी अंधविश्वासाच्या विरोधात शहीद झालेले व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन युवकांनी विवेकी मानवी मूल्यांसाठी संघर्ष करावा या हेतूने साधना प्रकाशन पुणे ‘तरुणाईसाठी नरेंद्र दाभोलकर’ हा ग्रंथ विवेकानंद जयंतीच्या दिवशी (१२ जानेवारी) रोजी प्रकाशित करणार आहे. या पुस्तकाचे लेखक दाभोलकरांबरोबर पंचवीस वर्षे अंधविश्वासाविरुद्धच्या लढाईत सहभागी असलेले प्रा. प. रा. आर्डे हे आहेत.

युवा वर्गासाठी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सुरज येंगडे या हार्वर्ड विद्यापीठातील युवक विचारवंताच्या हस्ते होणार आहे. सुरज येंगडे यांनी अमर्त्य सेन यांच्याबरोबर सामाजिक संशोधन केले असून त्यांचा कास्ट मॅटर्स हा ग्रंथ जगभर गाजत आहे. याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व मानणाऱ्या सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सुद्धा हा ग्रंथ ऑनलाईन प्रकाशित करतील. या समारंभासाठी डाॅ. हमीद दाभोलकर,साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत

हा कार्यक्रम मराठा समाज कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड सांगली येथे मंगळवार दि. १२ जानेवारी २०२० सायंकाळी पाच ते सात होईल.तसेच हा कार्यक्रम डॉ. नरेंद्र दाभोलकर थॉट्स आणि झूम लाईव्ह वर पाहता येईल.

Related Stories

तर एमपीएससी विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन – सदाभाऊ खोत

Archana Banage

तासगावात एकाच दिवशी 70 जण कोरोनामुक्त

Archana Banage

राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी

Archana Banage

अहिल्या शिक्षण संस्थेची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद- मंगेश मंत्री

Archana Banage

इस्लामपूर नगरपालिका : मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरुन सभा तहकूब

Abhijeet Khandekar

सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’

Archana Banage