प्रतिनिधी/सोलापूर
येथील पश्चिम मंगळवार पेठेतील बुधले गल्ली येथे राहणार्या संजय सुरेश माशाळकर (वय 32) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल सुमारे तीन वर्षांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फौजदार केतन मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 30 एप्रिल 2019 रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद झाली होती. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी मृताच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यावरून माशाळकर याचा अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरून गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. त्या पोलिसांनी अज्ञत्तत व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत