Tarun Bharat

तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण

७ जणांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल

अक्कलकोट / प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ येथील एका २५ वर्षीय तरुणास चहाचे कप देण्यावरून जातीवाचक शिवीगाळ करत लथाबुक्क्याने मारहाण करीत लोखंडी झारीने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध रात्री उशिरा अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि २९ रोजी दुपारी गावातील हॉटेलमध्ये घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि २९ रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी दिनेश बाबू बनसोडे वय २५ रा.पानमंगरुळ हा त्याच गावातील सिध्दराम कुडल यांच्या संगमेश्वर हॉटेलमध्ये फिर्यादीस जुन्या काचेच्या ग्लासमध्ये चहा का दिला असे विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून तू काय वरून आला का तू खालच्या जातीचा आहेस म्हणून सिध्दराम कुडल, तम्मा फकिरपा कुडल, शांतू सिध्दराम कुडल, शेखर महादेव कुडल, बाबू संगण्णा कुडल, संतोष बाबू कुडल व सिद्धय्या छडय्या स्वामी या सगळ्यांनी बोलले त्यानंतर हॉटेल चालक सिध्दराम कुडल याने भजी करण्याच्या लोखंडी झारीने फिर्यादिस डोक्यात नाकावर व तोंडावर मारले त्यानंतर तम्मा फकिरपा कुडल, सिद्धय्या छडय्या स्वामी यांनी फिर्यादिस हाताने लथाबुक्क्याने मारून जखमी केले व दमदाटी करून तेथून निघून गेले अशी ७ जणांविरुद्ध फिर्याद जखमी दिनेश बाबू बनसोडे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर हे करीत आहेत.

Related Stories

देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

datta jadhav

कठुआमध्ये सुरक्षा दलाने पाडला स्फोटकं लावलेला पाकिस्तानी ड्रोन

datta jadhav

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी पवनकुमार बन्सल

datta jadhav

राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

भारतीयांची उंची होतेय कमी

Rohit Salunke

अनर्थ टळला, मालगाडीचं इंजिन रुळावरुन घसरुन थेट घुसलं शेतात

Archana Banage