Tarun Bharat

तरुण भारतच्या वृत्ताची हेस्कॉमकडून दखल

Advertisements

काकतीनजीकच्या विद्युत खांबाची होणार दुरुस्ती

प्रतिनिधी / बेळगाव

पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर काकतीनजीक वाहनाने धडक दिल्याने महिन्याभरापूर्वी विजेचा खांब कलंडला होता. हा खांब धोकादायक स्थितीत असल्याने तो केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. या धोकादायक विद्युत खांबाचे वृत्त प्रसिद्ध होताच हेस्कॉमला जाग आली. संबंधित ट्रकचालकाकडून विद्युत खांबासाठी लागणारा खर्च वसूल करून घेण्यासाठी तयारी केली जात आहे.

दररोज हजारो वाहने राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करीत असतात. महिन्याभरापूर्वी एका लॉरी चालकाने काकतीजवळच्या बर्डे धाब्यानजीक एका विद्युत खांबाला धडक दिली. उच्च विद्युतभार असणाऱया वाहिन्या महामार्गाच्या दुसऱया बाजूला घेऊन जाण्यासाठी हा मोठा विद्युत खांब उभा करण्यात आला होता. परंतु या विद्युत खांबालाच धडक दिल्याने तो वाऱयामुळे केव्हा कोसळेल याची शाश्वती नव्हती. अचानक हा विद्युतखांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता वर्तविली जात होती.

या संदर्भात तरुण भारतने वृत्त प्रकाशित करताच हेस्कॉम प्रशासनाला जाग आली. हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी पोलीस प्रशासनाला पत्र लिहून धडक दिलेल्या वाहनचालकाकडून विद्युत खांब दुरुस्तीचा खर्च वसूल करून घेण्याची विनंती केली आहे. पोलीस प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित वाहनचालकाकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

खांबाची दुरुस्ती लवकरच

काकती गावानजीक ट्रकने विद्युत खांबाला धडक दिली होती. यामध्ये खांबाचे नुकसान होऊन तो कलंडला होता. याच्या दुरुस्तीसाठी संबंधित ट्रक चालकाकडून नुकसानीचा खर्च वसूल करण्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली आहे. यामुळे लवकरच या विद्युत खांबाची दुरुस्ती केली जाईल, असे हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता विवेक नाईक यांनी सांगितले.

Related Stories

बेळगाव-राकसकोप रस्ता डांबरीकरण कधी?

Amit Kulkarni

अपघातामुळे पोस्टमन पुतळय़ाच्या संरक्षक कठडय़ाचे नुकसान

Amit Kulkarni

बेळगाव बसस्थानकातून कोकणात धावल्या दोन बस!

Amit Kulkarni

विविध ठिकाणी योग दिन साजरा

Amit Kulkarni

शांताई वृद्धाश्रमातर्फे आशा कार्यकर्त्यांचा सत्कार

Amit Kulkarni

डॉक्टर्स डेनिमित्त डॉ.काळे यांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!