Tarun Bharat

`’तरुण भारत’ने घराचा कोपरा जिवंत केला

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तिचा आवडता कोपरा असतो.या कोपऱ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो. ती त्याची उर्जा,आठवण असू शकते. जशा इतर बाजू महत्वाच्या तसा कोपराही महत्वाचा असतो. तो जगण्याचे बळही देतो.कॉर्नर व्ह्यू च्या माध्यमातून तरुण भारतने घराचा कोपरा जिवंत केला, असे प्रतिपादन तरुण भारत'चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी केले. ते दै.तरुण भारत व लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑपरेटीव्ह सोसायटी लि.च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्यातरुण भारत कॉर्नर व्हÎू’या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांच्या बक्षिस समारंभात बोलत होते. यावेळी लोकमान्यचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील, क्षेत्रीय सहायक व्यवस्थापक आर.जी.पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकमान्यचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील म्हणाले, लोकमान्य सोसायटी नेहमीच सामाजिक उपक्रमांना बळ देत असते.ग्राहकांच्या विश्वासावर संस्थेची प्रगती सुरु आहे. ग्राहकांच्या ठेवींना सुरक्षितता देत विश्वासर्हता जपली आहे. संस्थेने नुकतेच लोकल फौंडेशन सुरु केले असून याअंतर्गत 32 गावे दत्तक घेतली आहेत. या गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी लोकमान्य प्रयत्न करत आहे. वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशिद म्हणाले, `तरुण भारत’च्या कॉर्नर व्हÎु सदराला चांगला प्रतिसाद मिळाला.या सदराअंतर्गत अत्यंत साध्या पद्धतीने देखील घराची सजावट चांगल्या रितीने करता येते हे दिसून आले.

मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे म्हणाले, कॉर्नर व्हÎु मधून आपल्या आवडत्या घरातील कोपऱयाचे दर्शन सर्वांना घडले. वाचकांनी या कोपऱयातुन मानसिक बळ मिळते. कल्पक सौदर्याला यातून प्रसिद्धी मिळाली. यावेळी भाग्यवान विजेते मिलींद रणदिवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तरुण भारत'चे कॉर्नर व्हÎू सदर खुप चांगले आहे. प्रत्येकाचे चांगले घर असावे असे स्वप्न असते. या घरातील प्रत्येक कोपरा कसा सुंदर होईल याकडे प्रत्येकजण कटाक्षाने लक्ष देत असतो. घरातील सौंदर्याला प्रसिद्धी देऊन वाचकांना आत्मीक आंनद देण्याचे कामतरुण भारत’ने केले. यावेळी उपस्थित इतर विजेते शैला आडुरकर, माधुरी पाटील, संजय अंगठेकर, मिलिंद रणदिवे आदींनी या कॉर्नर व्ह्यू सदराचे कौतुक केले.

लोकमान्यचे वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर ऋतुराज दळवी यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.विपणन व्यवस्थापक अभय पाटील यांनी लोकमान्य सोसायटीच्या दुर्वांकुर व इतर योजनांची माहिती दिली. आभार सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक आर.जी.पाटील यांनी मानले. यावेळी प्राशसक राहुल शिंदे, वितरण प्रमुख सचिन बर्गे, उपसंपादक विनायक भोसले, लोकमान्यचे मल्टीपर्पज व्यवस्थापक संजय कुरबेटकर, विपणन मॅनेजर अभय पाटील, अवधुत जांबिलकर, सदानंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

आजरा आगारातील 122 कर्मचारी कर्तव्यावर हजर

Abhijeet Shinde

धबधबेवाडी निवडणुक वादातील पोलिस मारहाण प्रकरणी संशियतास अटक

Abhijeet Shinde

फिरकी गोलंदाजीनं अभिषेक गाजवतोय मैदान, कुचबिहार ट्रॉफीत गौरव

Abhijeet Khandekar

अंबाबाईचे दर्शन ऑनलाईन बुकींगनंतरच !

Abhijeet Shinde

शाहूवाडी-शिराळा सीमा अजूनही लॉकडाऊन ; नागरिक संतप्त

Abhijeet Shinde

जिल्ह्यात एकूण २८६ पॉझिटिव्ह, शाहूवाडी सर्वाधिक ९५

Abhijeet Shinde
error: Content is protected !!