Tarun Bharat

‘तरुण भारत’ गडहिंग्लज कार्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ

मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन : दिशा पुरवणीचे प्रकाशन

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

‘तरुण भारत’च्या गडहिंग्लज कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्य़ाचा प्रारंभ जि. प. सदस्य सतिश पाटील, राणीताई खमलेट्टी, प्रा. अनिता पाटील-चौगुले, राजू खमलेट्टी, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, निवासी संपादक मनोज साळुंखे, वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रम्हदंडे, जाहिरात व्यवस्थापक आनंद साजणे, गडहिंग्लज प्रतिनिधी जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘दिशा’ या पुरवणीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एचआर मॅनेजर संतोष घोरपडे, प्रशासन अधिकारी राहूल शिंदे यांच्यासह वाचक, हितचिंतक व मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

Chandoli Sanctuary : चांदोली अभयारण्यालगतच्या वस्तीत शाळकरी मुलावर बिबट्याचा गंभीर हल्ला

Abhijeet Khandekar

निकालाआधीच जयश्री जाधवांच्या विजयाचे झळकले पोस्टर

Archana Banage

Kolhapur; मराठी फलक न लावणाऱ्या अस्थापनांना दणका

Abhijeet Khandekar

जिह्यातील 280 एकल कलाकारांचे मानधन जमा

Kalyani Amanagi

पालकमंत्री द्या अन् स्थगित विकासकामे सुरु करा !

Archana Banage

छ. राजाराम सहकारी साखर कारखाना एकरकमी एफ.आर.पी. देणार !

Archana Banage