Tarun Bharat

…तर आम्ही तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करु : अरविंद केजरीवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सद्य स्थितीत आमच्याकडे लस उपलब्ध नाही आहे. जर आम्हांला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाली तर आम्ही आगामी तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करु असा विश्वास दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. यासाठी दिल्लीला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जावी अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो, असेे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे मदत देखील मागितली आहे.


शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये 18 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या जवळपास दीड कोटी आहे. त्यामुळे आम्हाला 3 कोटी लसींची आवश्यकता आहे. 


आम्हाला आता पर्यंत केवळ 40 लाखच लसी उपलब्ध झाल्या आहेत. अजून आम्हाला 2.6 कोटी लस पाहिजे आहेत. पुढे ते म्हणाले, जर आम्हाला दररोज 80 ते 85 लाख लस उपलब्ध झाल्या तर आम्ही तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करू. सद्य स्थितीत आम्ही रोज 1 लाख नागरिकांचे लसीकरण करीत आहोत. जर आम्हाला रोज 3 लाख लस उपलब्ध झाल्या तर आम्ही लसीकरण मोहीम लवकरच पूर्ण करू शकतो. 

सध्या 45 वर्षांखालील तरुणांना डोस दिले जात आहेत. लसीकरणासाठी तरुणांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे. लोक सरकारी यंत्रणेवर खूश आहेत. लसीकरण व्यवस्था जवळपास 100 शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून येत्या काही दिवसांत 250 ते 300 आणखी शाळांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार

datta jadhav

500 डॉक्टरांचा एकाच वेळी भाजपात प्रवेश

datta jadhav

मूसाने न्यायाधीशावर फेकले चप्पल

Patil_p

पँडोरा पेपर्स प्रकरणी चौकशीचा आदेश

Patil_p

…तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल

datta jadhav

कोरोना संसर्ग असो किंवा सीमेवरील आव्हान,भारत सर्वांशी लढण्यास तयार : नरेंद्र मोदी

Tousif Mujawar