Tarun Bharat

..’तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल’

ऑनलाईन टीम

देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीत अनेक रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. अनेकांनी घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबे हतबल झाली आहेत. याबाबतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करत आपली भूमिका मांडली आहे.

केंद्र सरकारने मांडलेल्या या प्रतिज्ञापत्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळी ठरलेल्यांनाच मदत करण्याची तरतूद आहे. जर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची म्हटलं, तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल. आणि एकूण खर्चही वाढू शकतो, असं केंद्रानं न्यायालयाला सांगितलं आहे.

“एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी कोरोनाबळींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासाठी वापरण्यात आला, तर कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी, विविध अत्यावश्यक औषधी आणि पुरवठा साहित्यासाठी व मदत करण्यासंदर्भात राज्यांकडे पैसाच राहणार नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेपलीकडची आहे,” केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना म्हटलं आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ७१३ जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे.

Related Stories

सुप्रिया लाइफ सायन्सचा येणार आयपीओ

Patil_p

दिल्ली : दिवसभरात 63 मृत्यू, आणखी 1,674 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

‘येस बँके’च्या राणा कपूर यांना जामीन

Patil_p

भोपाळमध्ये दोन तासात तीन इंच पाऊस

Patil_p

प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज – राज्यपाल

Abhijeet Khandekar

शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील, कोणाची खेळी?

datta jadhav