Tarun Bharat

”…तर तालिबान्यांना सडेतोड उत्तर देऊ” – जो बायडेन

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन

अफगाणवर कब्जा करत तालीबान्यांनी प्रारंभी मवाळ भुमिका घेतल्याचे दाखवले होते. मात्र दिवसेंदिवस त्यांचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडत आहे. अमेरिकेने या चिघळत्या परिस्थितीवर बारिक नजर ठेवली आहे.गुंतागुंतीच्या स्थितीने अफगाण नागरिकांबरोबरच जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. याचवेळी तालिबानमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. अमेरिका नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात तालीबानने बचावकार्य कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल” असा जो बायडेन यांनी तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे.

जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अफगाणिस्तानमधून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या सुरू असलेल्या मदतकार्याविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी हे इतिहासातील सर्वात मोठे आणि कठीण एअरलिफ्टपैकी एक आहे. याचा अंत कसा होणार आहे. हे आत्ता सांगणे कठीण आहे असे बायडेन म्हणाले.

“आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल”,आमचा दहशतवादाविरोधातील लढा सूरुच राहील आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच देशांसोबत आम्ही मिळून काम करू, असं बायडेन यांनी सांगितलं.

Related Stories

बेळगाव निवडणूक : मराठी माणसाचा पराभव नव्हे तर लोकशाहीची हत्या

Archana Banage

राष्ट्रपतींनी शिवभक्तांचा मान राखला, रोपवेने जाणार रायगडावर

Archana Banage

12 सप्टेंबरपासून 80 रेल्वे धावणार

Patil_p

हवाई दलाचे C-17 काबुलसाठी सज्ज

datta jadhav

तणाव विकोपाला

Patil_p

जबरी चोरीतील आरोपीस पाठलाग करुन जेरबंद

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!