Tarun Bharat

…तर `त्यांच्याच’ शैलीतच ठोकून काढू; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

प्रतिनिधी / कोल्हापूर

केवळ राजकीय आकसातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला लक्ष करीत आहेत. दसरा मेळाव्यात अतिशय खालच्या पातळीवर भाजप नेत्यांना शिवराळ भाषेत टिका केली. मात्र आता यापुढे हे खपवून घेणार नाही. गाल पुढे करणाऱयातले आम्ही नाही. ठाकरे शैलीचा आम्हालाही चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्याच भाषेत ठोकून काढायाल मागे पुढे पहाणार नाही. असा खणखणीत इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सोमवारी मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदे एका प्रश्नावर ते बोलत होते.

ते म्हणाले, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण हे शिमगा मेळाव्या सारखे झाले. या भाषता फक्त भाजपच्या नावाने शिमगा करण्यात आला. आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत. याचही भान त्यांना नव्हतं इतक्या खालच्या पट्टीतील शब्दात भाजप नेत्यांवर टिका करण्यात आली. हिंदुत्वाचा ठेका यांना दिलेला नाही. कोण ठोंग करतयं हे जनतेला चांगलेच महिती आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदाची गनिमा राखली नाही. तर इतरांची कशाला चौकशी करता, अशा शब्दात फटकारत नारायण राणे यांची पाठराखण केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून दसरा मेळाव्यात जनतेच्या प्रश्नांना हात घालणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. कोरोनामुळे पुढील शैक्षणिक धोरण काय असेल, सत्र कसे ठरवणार या विषयी काहीच हालचाली नाहीत. या गंभीर विषयाकडे सरकार आणि त्यामधिल मंत्री अजिबात गंभीर नाहीत. असा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

विद्यापीठ सुधारणा कायदा रद्द करा

Abhijeet Khandekar

बनाचीवाडी येथे म्हैशीने ८ पाय २ शेपूट असलेल्या मृत रेडकाला दिला जन्म

Archana Banage

मी अपक्ष उमेदवार आहे अपक्षच राहीन – सत्यजीत तांबे

Archana Banage

पुलाची शिरोली ग्रामपंचायत सदस्या सुरेखा चव्हाण यांचा जातीचा दाखला अपात्र

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज येथील वारणा पूल अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला

Archana Banage

ठाकरे सरकारची माझ्यावर हेरगिरी; खासदार संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

Archana Banage