Tarun Bharat

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

मुंबई\ ऑनलाईन टीम

ब्रेक द चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष व पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा गोंधळ निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची रविवारी एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक द चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत. कोणत्याही पातळीवर सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

करोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण जे टप्पे ठरविले असले तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.

आपल्यासमोर करोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आ,हे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे. यासाठी आपापल्या जिल्ह्यात पुरेशी जनजागृती करा, अशा सुचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी आपण करोनामुक्त गाव करा. म्हणून आवाहन केले आहे. या करोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

कोणी दम दिला तर घरात घुसून मारणार; बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणांचे प्रत्युत्तर

Archana Banage

मुलांवरील लसीचे परीक्षण रोखण्यास नकार

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,83,723 वर

Tousif Mujawar

शिकारबंदी कायदा रद्द करावा

datta jadhav

नवाब मलिकांना ईडीकडून अटक

Archana Banage

बामणोलीत फेटलिंग शॉप फोडून सव्वा लाखाच्या कास्टींगची चोरी 

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!