Tarun Bharat

…तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

दहशतवादी संघटनांना अर्थसाह्य आणि गैरव्यवहार रोखण्यास पाकिस्तानला अपयश आल्याने एफएफटीएफची संस्था असलेल्या आशिया पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला ‘एनहान्स्ड फॉलो अप’च्या यादीत ठेवले आहे. त्यामुळे पाकिस्तान ग्रे लिस्ट मधून बाहेर पडू शकत नाही. उलट एफएफटीएफने दिलेल्या 27 मुद्यांना पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला तर त्याचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो. 

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर एफएफटीएफने पाकिस्तानला 27 मुद्द्यांवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी पाकला निर्धारित वेळही दिला आहे. पाकिस्तान जर या 27 मुद्यांना पूर्ण करण्यात अपयशी ठरला तर त्याचा काळ्या यादीत समावेश निश्चित आहे. 

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद अशा संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत. पाकिस्तान त्यांना अद्याप रोखू शकला नाही. जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मसूद अजहर तसेच 2008 च्या मुंबई हल्ल्यातील प्रोजेक्ट मॅनेजर साजिद मिर यासारख्या दहशतवाद्यांवर पाक सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.

Related Stories

गलवान खोऱ्यातील संघर्षाबद्दल चीनने मौन सोडले!

datta jadhav

‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला द्या अन्यथा गोठवा; शिंदेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

Archana Banage

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

Abhijeet Khandekar

कोरोना बळींच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी

datta jadhav

नायजेरियात तुरुंगावर हल्ला; 2 हजार कैद्यांनी केले पलायन

datta jadhav

अमेरिका पुन्हा चंद्रावर जाण्यास सज्ज

Amit Kulkarni