Tarun Bharat

…तर प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करू – नारायण राणे

चिपळूण/ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात माध्यमांनी राणेंना विचारले असता माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही मी तुमच्या बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला माध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान नारायण राणेयांच्यावर रायगड, महाड, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी गुन्हे दाखल झाले असून राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे.

दरम्यान, माध्यमांनी नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा यावेळी नारायण राणे यांनी केली.

Related Stories

पतंजलीकडून ‘कोरोनिल टॅबलेट’ सादर

Patil_p

कोल्हापुरात आज आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

सोलापूर : बार्शीनजीक बस पेटवल्याप्रकरणी चौघे अटकेत

Archana Banage

चिंता वाढली : महाराष्ट्रात 18,105 नवे कोरोना रुग्ण; 391 मृत्यू

Tousif Mujawar

‘कोव्हिशिल्ड’ डोसमधील अंतर कमी करणार

Amit Kulkarni

दाजीपूर अभयारण्य दोन दिवसासाठी बंद राहणार,वनविभागाची माहिती

Archana Banage