Tarun Bharat

…तर भारतात दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नसला तरी देखील तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 70 पट अधिक संक्रमणकारक आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी ब्रिटनमध्ये 93 हजार कोरोना रुग्ण आढळून आले. ब्रिटनमधील ही रुग्णवाढ आणि भारतातील सद्य परिस्थितीची तुलना करत भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा अचानक वाढलेला आवाका पाहता असा उद्रेक भारतात झाला तर दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील, असे पॉल यांनी म्हटले आहे.

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचा तब्बल 91 देशांमध्ये संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये तो अत्यंत वेगाने होत आहे. यामुळेच जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांना यातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे 113 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रमणकारक आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये अचानक रुग्णवाढ झाली असावी. शुक्रवारी ब्रिटनमध्ये आढळलेल्या 93 हजार रुग्णांमध्ये 3201 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून त्या व्हेरिएंटची ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. ब्रिटनमधल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 14 हजार 909 इतका झाला आहे.

ब्रिटनमधील अचानक झालेली रुग्णवाढ आणि भारतातील सद्य परिस्थिती विचारात घेता असा उद्रेक भारतात झाल्यास दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण सापडतील, असा इशारा पॉल यांनी दिला आहे.

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे 3 ऑक्टोबरला होणार उद्घाटन

Rohan_P

विजयन थॉमस यांचा भाजपमध्ये प्रवेश

Patil_p

१४ दिवस लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करा : कोविड सल्लागार समिती

Abhijeet Shinde

काँग्रेस आमदाराकरता योगी आदित्यनाथ पूजनीय

Patil_p

एलओसीवर गॅटलिंग अँटी ड्रोन गन तैनात

datta jadhav

उत्पन्नावरून नव्हे, आता राहणीमानवरून ठरणार दारिद्र्यरेषा

datta jadhav
error: Content is protected !!