Tarun Bharat

…तर मेडिकल बंद ठेवणार

औषध विक्रेत्यांचा केंद्र व राज्य सरकारला इशारा, लसीकरणात प्राधान्य न दिल्याबद्दल तीव्र नाराजी

पुणे : औषध विक्रेते हे कोविड पेशंट वा त्यांच्या नातेवाईकांच्या सातत्याने संपर्कात येत असतानाही त्यांचा कोविड योद्धे म्हणून सन्मान करण्यात आलेला नाही. तसेच लसीकरणातही त्यांना प्राधान्य देण्याबाबत औदार्य दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारबद्दल विक्रेत्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. सरकारची भूमिका अशीच असेल, तर संपूर्ण लॉकडाउनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अँड ड्रगिस्टस् असोसिएशनने दिला आहे. याबाबत अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे संघटनेची भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविड 19 चे बळी ठरले आहेत. याशिवाय हजारच्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. दुसऱ्या लाटेतही जीवावर उदार होऊन विक्रेते सेवा देत आहेत. त्यांच्यामुळेच राज्यासह देशातील औषध पुरवठा सुरळीत राहिला आहे. मात्र, असे असतानाही सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. लसीकरण सुरू झाले असले, तरी औषध विक्रेतेही कोरोना योद्धे आहेत, हे ध्यानात घेऊन त्यांना प्राधान्य दिले गेलेले नाही. 

याबाबत संघटनेकडून वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार करण्यात आला. तरीही शासनाने त्याची दखल घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिली, तर सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेऊन वेगळी पावले उचलावी लागतील. म्हणूनच आता तरी शासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा, नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घेऊ, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Stories

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा ; ईडीला कारवाई न करण्याचे आदेश

Archana Banage

दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

datta jadhav

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे शनिवारी पुण्यात चक्काजाम आंदोलन

Tousif Mujawar

अपहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांवर गुन्हा

datta jadhav

सणसवाडी औद्यागिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग

Tousif Mujawar

सोलापूर : कवठेकर प्रशालेच्या सावनी दोशीला दहावीला १०० टक्के गुण

Archana Banage