Tarun Bharat

”…तर रशिया अण्वस्त्राचा वापर करणार”

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत

गेले 28 दिवस सुरु असलेलं युक्रेन – रशिया युद्ध सुरुच आहे. दिवसें – दिवस विध्वंसक क्षेपणास्त्रांचा वापर करत युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडणे हा रशियाचा मनसुभा असुन, युक्रेन ही आपल्या निर्णयावर ठाम असुन नमायला तयार नाही. यामुळे मात्र दोन्ही राष्ट्रांसह जगाची सामाजिक, अर्थिक, नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यातच भर पडणार विधान समोर आलं असुन क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलखती दरम्यान बोलताना स्पष्ट केलं आहे कि, रशियाला अस्तित्वाचा धोका असेल त्यादिवशी रशिया नक्की अण्वस्त्राचा वापर करेल, असं मोठं विधान केलं आहे.

युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरूच आहे. इतके दिवस सुरु असलेले युद्ध कोणत्या स्तरापर्यंत जाणार याची धास्ती कायम लागलेली आहे. या युद्धात रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार का ? आणि कधी करणार ? हे ही प्रश्न कायम जगभरातील नागरिकांना सतावत आहेत. नेमकं याबाबतच क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिलेल्या मुलखतीत सांगितले कि, रशियाला अस्तित्वाचा धोका असेल, त्यादिवशी रशिया नक्की अण्वस्त्राचा वापर करेल.

आम्हाला देशांअंतर्गत सुरक्षेची कल्पना आहे. अण्वस्त्रांच्या वापराची सर्व कारणे तुम्ही वाचू शकता. आपल्या देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर नियमानुसार त्याचा वापर होऊ शकतो, असे पेस्कोव्ह म्हणाले.त्यामुळे सद्याच्या स्थितीत रशिया , युक्रेन यांच्याबरोबरच दोन्ही बाजुंचं समर्थन करणारी इतर राष्ट्रे ही उतरल्याने जगभरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. यामुळे ही स्थिती कधी अधिक उसळी घेईल आणि हल्ल्यासाठी कीती विध्वसंक शस्त्र वापरतील हे सांगता येणं कठीण आहे. ज्याच्यामुळे होणारी हाणी ही केवळ दोन राष्ट्रांची नसेल तर ती संपुर्ण जगाची असेल हे मात्र निश्चित.

Related Stories

मोल्दोवामध्ये बॉम्बस्फोट, रशियासोबत युद्धाची भीती

Patil_p

भाजपकडून त्रिपुरामध्येही नेतृत्त्वबदल

Patil_p

येडियुराप्पा यांच्या नातीने संपविली जीवनयात्रा

Patil_p

जम्मू : मास्क न घातल्यास 500 रु, तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 3 हजार रुपये दंड

Rohan_P

हैद्राबाद : औषधाच्या फॅक्टरीत भीषण आग; 8 जण गंभीररित्या भाजले

Rohan_P

कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणू नका

Patil_p
error: Content is protected !!