Tarun Bharat

…तर राजेश पाटणेकर यांना मंत्रीपदही मिळेल – डॉ. प्रमोद सावंत

Advertisements

तरुण भारत / सुमित तांबेकर

डिचोली मतदार संघातील भाजपचे उमेदवार सभापती राजेश पाटणेकर यांच्या डिचोली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दि २७ जानेवारी रोजी पार पडले. हे उद्धाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, डिचोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजेश पाटणेकर, हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या काही वर्षात आपण वेगाने विकास कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये डिचोली पोलीस स्थानक, डिचोली प्रशासकिय इमारत, डिचोली शहर विकास कार्यक्रम आदि. विकास कामे मार्गी लावली असून ही विकास करण्याची संधी डिचोलीकरांनी सभापती पाटणेकर यांच्या रुपाने भाजपला पुन्हा द्यावी अशी विनंती सावंत यांनी मतदारांनी केली.

यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना आमदार पाटणेकर हे व्यक्तीमहत्त्व कायमच सामान्य लोकांसाठी उपलब्ध राहीले आहे. ते यापुढे ही कायम राहणार आहे. तसेच मतदार संघाचा विकास हा पाटेणकर यांच्या कारकिर्दित झाला असुन याला मतदार संघातील नागरीक साक्षी आहेत. त्यामुळे डिचोलीच्या विकासाकरीता पाटणेकर हे विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक असल्याचे सावंत यावेळी म्हणाले. यावेळी डिचोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजेश पाटणेकर, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Stories

मधमाशांच्या हल्ल्यात नेपाळी कामगाराचा मृत्यू

NIKHIL_N

माजगाव चिपटेवाडी रस्त्याची दुरूस्ती करा-वाहनचालकांची मागणी

Ganeshprasad Gogate

‘शिकारी’ बिबटय़ा सीसीटीव्हीत कैद

NIKHIL_N

जिह्यात कमी चाचण्यामुळे रूग्णसंख्येत घट

Patil_p

युवा नेते कन्हैया कुमार दोन दिवसाच्या गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

रेव्ह पाटर्य़ांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा मायकल लोबो यांची माहिती

Omkar B
error: Content is protected !!