Tarun Bharat

…तर ‘व्हॉल्व्हमनला बांधून घाला’

Advertisements

पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयाचा अजब सल्ला : ‘त्या’अधिकाऱयावर कारवाई करा

प्रतिनिधी / बेळगाव

श्रीनगर भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता व्हॉल्व्हमनला पकडून बांधून ठेवा, असा अजब सल्ला देण्यात आला. त्यामुळे अधिकाऱयाच्या बेजबाबदार उत्तराबद्दल पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार करण्यात आली.  अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.

श्रीनगर भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवडय़ात येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. पण याबाबत पाणीपुरवठा मंडळाने कोणतीच दखल घेतली नाही. पुन्हा अवेळी व अपुरा पाणीपुरवठा करण्यात आल्याने पाणीपुरवठा मंडळाच्या उत्तर विभागाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार करून पाणीपुरवठा करावा, अशी विनंती करण्यात आली. पण सदर अधिकाऱयाने नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्याऐवजी व्हॉल्व्हमनला बांधून घाला असा अजब सल्ला देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

अभियंत्यांच्या वक्तव्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. समस्येचे निवारण करण्यासाठी तक्रार केली असता अजब सल्ला देणाऱया अधिकाऱयाच्या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. वास्तविक पाहता उच्च पदावर काम करणाऱया अधिकाऱयाने समस्येची माहिती घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना आणि व्हॉल्व्हमनला सूचना देणे आवश्यक होते.

पण झाडाला बांधून घालण्याचा सल्ला दिल्याने अभियंत्याचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर आला आहे.

त्यामुळे श्रीनगर येथील नागरिकांनी माजी नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी  पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन तक्रार केली. सदर बेजबाबदार अधिकाऱयावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती केली.

श्रीनगर येथील पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बसवणकोळ्ळ जल शुद्धीकरण केंद्राबरोबर जलकुंभ उभारण्यात आला आहे. पण सदर जलकुंभाची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनाच नसल्याची बाब तक्रारीवेळी निदर्शनास आली. दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला असून, या जलकुंभाद्वारे श्रीनगर आणि माळमारुती परिसरात पाणीपुरवठा करता येऊ शकतो. पण जलकुंभाची उभारणी केल्यापासून पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी फिरकले देखील नाहीत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. त्यामुळे जलकुंभाची पाहणी करून याद्वारे परिसरातील पाणी समस्येचे निवारण करू, असे सांगण्यात आले. यावेळी श्रीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.  

पण झाडाला बांधून घालण्याचा सल्ला दिल्याने अभियंत्याचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर आला आहे.त्यामुळे श्रीनगर येथील नागरिकांनी माजी नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन तक्रार केली. सदर बेजबाबदार अधिकाऱयावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती केली. श्रीनगर येथील पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बसवणकोळ्ळ जल शुद्धीकरण केंद्राबरोबर जलकुंभ उभारला आहे. पण सदर जलकुंभाची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनाच नसल्याची बाब तक्रारीवेळी निदर्शनास आली. दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारला असून, या जलकुंभाद्वारे श्रीनगर आणि माळमारुती परिसरात पाणीपुरवठा करता येऊ शकतो. पण जलकुंभाची उभारणी केल्यापासून पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी फिरकले देखील नाहीत, अशी तक्रार करण्यात आली. त्यामुळे पाहणी करून परिसरातील पाणी समस्येचे निवारण करू, असे सांगण्यात आले. यावेळी श्रीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

केदनूर-मण्णीकेरी येथे घरांची पडझड

Amit Kulkarni

विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा

Amit Kulkarni

कलामंदिर व्यापारी संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

Amit Kulkarni

सिग्नेचर इलेव्हन, युनियन जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

फौंड्री क्लस्टरमध्ये एकदिवसीय विकास कार्यक्रम

Omkar B

शिवराय आणि तानाजींची शौर्यगाथा अविस्मरणीय

Patil_p
error: Content is protected !!