Tarun Bharat

..तर समुद्रामध्ये संघर्ष अटळ

पारंपरिक, पर्ससीन संघटनांचा इशारा

परपांतीय नौकांचा एलईडीव्दारे मासळीवर डल्ला

प्रतिनिधी / रत्नागिरी

मलपी, गुजरात, गोवा व कर्नाटक येथील परपांतीय नौका जिह्याच्या हद्दीमध्ये बिनदिक्कत एलईडीव्दारे मासेमारी करत आहेत. येथील मासळीवर डल्ला मारणार्‍या परपांतीय नौकांवर प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र लढा देण्यात येणार असल्याची माहिती पारंपरिक व पर्ससीन संघटनांनी दिली.

जिह्याच्या हद्दीमध्ये मलपी, गुजरात, गोवा, कर्नाटक तसेच सिंधुदुर्गमधील काही नौका एलईडीव्दारे मासेमारी करत असल्याचे मच्छीमारांच्या निर्दशनास आले आहे. यामुळे स्थानिक पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांना रिकाम्या जाळ्याने माघारी येण्याची वेळ आली आहे. काही दिवसापूर्वी नौकांना घोळ तसेच इतर निर्यातक्षम मासळी मिळत असल्याचे व्हीडोओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यामुळे परपांतीय नौकांनी आपला मोर्चा जिह्याच्या सागरी हद्दीमध्ये वळवला आहे. एलईडी लाईटच्या माध्यमातून अवैधपणे मासळीची लूट करण्यात येत आहे. याबद्दल मत्स्य व संबंधित विभाग कारवाई करत नसल्यामुळे समुद्रामध्ये परपांतीय नौकांविरुध्द संघर्ष करण्यासाठी पारंपरिक व पर्ससीन संघटना एकवटल्या आहेत़
या घुसखोरी करणाऱया नौकांविरुध्द कारवाई न केल्यास समुद्रामध्ये संघर्ष अटळ असून होणाऱया परिणामाला सरकार व पशासन जबाबदार असतील असे पारंपरिक व पर्ससीन संघटनांनी म्हटले आहे. यावेळी रत्नागिरी तालुका पर्ससीन संघटना अध्यक्ष विकास ऊर्फ धाडस सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, कार्याध्यक्ष विजय खेडेकर, किशोर नार्वेकर, जितू बीर्जे, ओंकार मोरे तसेच जिल्हा पर्ससीन संघटनेचे नसरुद्दीन पटेल, हानीफ मालदार, मेहबूब फडनाईक, मजर मुकादम, पारंपरिक मच्छीमार हर्णेचे महेंद्र चौघुले, पी. एन. चौघुले, पावशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

देवगड मध्ये सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन

tarunbharat

राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेस ग्रीन व व्हाईट बोर्ड प्रदान

Anuja Kudatarkar

रिफायनरीसाठी आरामको बांधिल

Patil_p

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Archana Banage

निम्मे प्रवासी घेऊनही एसटी सेवा तोटय़ातच

NIKHIL_N

मार्गताम्हानेत मध्यरात्री आग लागून कार, दुचाकी खाक

Patil_p