Tarun Bharat

…तर सीरममधून लसीचे वाहन बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात करोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लसीविना बंद करण्यात आली असून, मुंबईतही आठवडाभरासाठी केवळ शासकीय लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मेसेज येईल त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे महापौर यांनी जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यात शाब्दिक चकमक सुरू असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.

मंत्री हर्ष वर्धन आणि प्रकाश जावडेकर यांनी टीका केल्यानंतर राजेश टोपे यांनी आकडेवारी सांगत वस्तुस्थिती मांडली होती. ‘लस’ पुरवठ्यावरून केंद्र-राज्य यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहत एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही,” असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना दिला आहे.

Related Stories

नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार

datta jadhav

गुजरात रणकंदन 25-11-2022

Amit Kulkarni

‘रेमडेसिवीर’च्या वापरावर निर्बंध

datta jadhav

आमशी गावात कोरोनाचे २८ रुग्ण ; तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिली भेट

Archana Banage

नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा करण्यात आला सत्कार

Anuja Kudatarkar

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग

Patil_p