Tarun Bharat

…तर हे भाजपला नक्की महागात पडेल – संजय राऊत


“मर्दानगी होती तर मोहम्मद जिनांवर गोळी का झाडली नाही?”

ऑनलाईन टीम / तरुण भारत

पाच राज्यांच्या विधानसभांचे रणशिंग फुंकले असुन राजकिय पक्ष आणि नेते आपले कसब पणाला लावत सत्ता वर्चस्वासाठी गतीमान झाल्याचे चीत्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या अनुशंगाने भाजप शासकिय यंत्रणेवर दबाव आणत आहे. असे सांगताना उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भाजप शिवसेनेला घाबरते, म्हणून ते हे सगळं करताहेत. ही लोकशाही नाही असे ही ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. पण भाजप आता ते जे करते आहे ते त्यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आतापर्यंत शिवसेनेच्या ५-६ उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीर ठरवत रद्द करण्यात आले आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. गोव्यातही असाच प्रकार सुरू आहे. एकतर आमच्यामुळे त्यांचा पराभव होईल, किंवा आम्ही जिंकू, या कारणांनेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आमची भीती वाटतीये,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती असे म्हटले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, की गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. असं ते म्हणाले. “मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवाल राऊतांनी केला. क्रांतीकारक म्हणून गांधीचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर कधीच गोळ्या झाडू शकत नाही,” असं राऊतांनी सांगितलं.

Related Stories

ट्रूनॅट मशीनव्दारे होणार कोरोना विषाणूची चाचणी ; महापालिकेच्या चाचणी केंद्रास मंजुरी

Archana Banage

फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांना फराळाचे वाटप

Anuja Kudatarkar

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

93 वर्षीय साहित्यिक, 8 दिवसांत कोरोनावर मात

Patil_p

येत्या सोमवारपासून किलबिलाट वाढणार

Patil_p

‘कमळ थाळी’चा ओरोसमध्ये शुभारंभ

NIKHIL_N