Tarun Bharat

तलवारीने केक कापून वाढदिवस, ६ जणांवर गुन्हा

प्रतिनिधी / कोल्हापूर


कोल्हापूर राजारामपुरी येथील बेकरी चौकात संचारबंदीचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला जात होता. या ठिकाणी पोलिसांनी धाव घेवून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना रोखले. त्या दरम्यान अतिउत्साही तरुणानी पोलिसांना धक्काबुक्की केली. या घटनेबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संचारबंदी असताना घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. तरीही या आदेशाचे उल्लंघन करुन रात्रीच्या वेळी चौकात तरुण केक कापत असल्याने या बाबाबत त्यांनी राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी याबाबत त्यांना सूचना केल्यानंतर त्या तरुणांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. तसेच या अतिउत्साही तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. संचारबंदीचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे, हत्यार बाळगणे व शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना धक्काबुक्की करणे अशा स्वरुपाचे गुन्हे या सहा जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक नवनाथ घोगरे करीत आहे

Related Stories

माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्याची नामुष्की

Archana Banage

सातारा जिल्ह्यातील १६३ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Archana Banage

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7000 पानांचे आरोपपत्र

datta jadhav

कराडला 24 पासून यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन

Patil_p

नवरीसारखा वर्षा बंगला सोडला; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरेेेंवर बोचरी टीका

Archana Banage

हातकणंगले काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीबाबत तहसीलदारांना निवेदन

Archana Banage