Tarun Bharat

तलाठी कार्यालये पडली ओस…

बेमुदत कामावर बहिष्कार, जिह्यात सुमारे पाचशे तलाठी, मंडल अधिकायांचे आंदोलन, नागरिकांची गैरसोय

प्रतिनिधी/कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना अपशब्द वापरणार्या राज्याचे ई-फेरफार प्रकल्प समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी तलाठ्य़ांनी बुधवारपासून बेमुदत कामावर बहिष्कार आंदोलन सुरु केले. यामध्ये जिह्यातील सुमारे 500 तलाठी व मंडल अधिकारी सहभागी झाले. यामुळे सर्व तलाठी कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
महसूली लेखे जोखे संगणकीकृत करणे, 7/12 व ई फेरफार, ई चावडी या वाविध योजना तलाठी, पटवारी व मंडळाधिकारी यांनी स्वखर्चाने व रात्रंदिवस काम करून, महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. असे असताना जगताप यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन त्यांची बदली करावी, यासाठी महाराष्ट्र तलाठी संघाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने 7 ऑक्टोबरपासून टफ्फ्या टफ्फ्याने आंदोलन पुकारले आहे.

बुधवारपासून तलाठय़ांनी कामावर बेमुदत बहिष्कार घातला. यामुळे जिह्यातील सर्व तलाठी कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट राहीला. कामासाठी येणार्या नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. रामदास जगताप यांच्यावर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार तलाठ्य़ांनी केला आहे. परंतु आंदोलन कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती व निवडणूक आयोगाचे काम आदेशाप्रमाणे केले जाणार आहे, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : आळवे व उत्रे शाळेची विद्युतीकरणासाठी निवड

Archana Banage

कोल्हापूर : केंद्र सरकारवर दबाव वाढवा

Archana Banage

छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी दिलीपराव पाटील

Archana Banage

‘सारथी’ला उर्वरीत 94 कोटी 25 लाख अनुदानाचे वितरण

Archana Banage

विकेंड लॉकडाऊननंतर शहर रस्त्यावर

Archana Banage

कोल्हापूर : बालिंगेची राष्ट्रीय पेयजल अंधारात

Archana Banage