Tarun Bharat

तळवणेत ‘हेल्पलाईन’ने सावरले घर

सुरेंद्र मेस्त्राr याच्या घरावर कोसळले झाड

ग्रुपने दिली 50 हजारांची मदत

प्रतिनिधी / सावंतवाडी:

तळवणे-सुतारवाडी येथे निसर्ग वादळात पहाटे तीनच्या सुमारास वटवृक्ष कोसळला. यात तीन घरांचे 2 लाख 67 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, यात मोठा धक्का बसला तो सुरेंद्र मेस्त्राr या युवकाला. त्याचे घर उद्ध्वस्त झाले. आधीच लॉकडाऊन आणि त्यात घर कसे दुरुस्त करावे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. अशावेळी गावातील हेल्पलाईन व्हॉट्सऍप ग्रुपने दोन दिवसात 50 हजार रुपयांची मदत जमा करत सदर कुटुंबाला दिलासा दिला.

घराच्या दुरुस्तीसाठी किमान दोन लाख रुपये लागणार होते. आधीच तीन महिने लॉकडाऊन असल्याने हाती पैसा नव्हता. सुरेंद्रचे वडील वयोवृद्ध आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे. आई व स्वतः मोलमजुरी करून तो कुटुंबाचा गाडा हाकतो. त्याने मे महिन्यात किरकोळ काम करून पावसाळय़ात लागणारा किराणा, धान्य घरी आणून ठेवले होते. मात्र, एका रात्रीत घरावर झाड कोसळल्याने या कुटुंबाला धक्का बसला.

या संकटकाळात या कुटुंबाला मदतीचा हात दिला तो हेल्पलाईन व्हॉट्सऍप
ग्रुपने. सुरेंद्र याचे शेजारी प्रवीण बर्वे हे ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांनी ग्रुपवर या संकटाची माहिती दिली. सुरेंद्र हा क्रिकेट खेळाडू असल्यामुळे ग्रुपवर थोडाफार परिचय होता. ग्रुपमधील गोव्यात काम करणारे युवक लॉकडाऊनमध्ये दोन महिने घरीच होते. कोणतीही कमाई नसतानाही या ग्रुपमधील सदस्यांनी 100, 200, 500, 1000 अशी मदत देण्यास सुरुवात केली. दोन 2 रात्रीत तब्बल 50 हजार रुपये जमा करत युवकांनी नवा आदर्श निर्माण केला.

या मदतीची माहिती मिळताच पुणे येथील फ्लाईंग बर्ड स्कूलचे संचालक जयंत परांजपे व परिवारानेही दहा हजार रुपयांची मदत केली. या आधी या ग्रुपने साटेली येथील अपघातात पाय गमावलेल्या युवकाला नवीन ऍक्टिव्हा गाडी दिली. तसेच दोडामार्गमधील ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णासाठी रक्तदानही केले होते.

मुकेश कांबळी, जयंत परांजपे व कुटुंबीय, खेमराज सनाम, विशाल मेस्त्राr, पूजा पाटील, सत्यवान नाईक, विवेक कोरगावकर, हरी कांबळी, प्रथमेश प्रभू, वैभव नाईक, मंदार वेंगुर्लेकर, हर्षद साळगावकर, शंकर (मळगाव), समीर मळगावकर, मुकेश परब, अबूबकर नदाफ, बाबू गोडकर, संदीप कांबळी, समीर पालव, रुपेश बर्डे, उमेश बर्डे, तुषार पेडणेकर, दादा नाईक व प्रवीण बर्वे यांनी ही मदत दिली.

Related Stories

कोरोना’मुळे कोकणात रोजगाराचा ‘टॉप गियर’

Patil_p

कोकण मार्गावर मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Patil_p

स. का. पाटील महाविद्यालयाच्या प्रा. सुनीता आजगांवकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

Ratnagiri : गणपतीपुळे समुद्रात बुडताना एकाला वाचविले

Abhijeet Khandekar

भर पावसातही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरु

Patil_p

पोलिसांनी उठाबशांसारख्या शिक्षा करू नयेत!

NIKHIL_N