Tarun Bharat

तळीरामांचा अखेर संयमाचा बांध फुटला

प्रतिनिधी/रत्नागिरी

रत्नागिरीत सोमवार पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. पूर्व परवानगीने दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र ही दुकाने उघडण्यापूर्वीच तळीरामानी दारू दुकांनाबाहेर रांग लावली. दीड महिना वाट पाहिलेल्या तळीरामच्या संयमाचा बांध फुटला. अत्यंत सोशिक तळीरामानी रांग लावताना सोशल डिस्टन्स नियमांचे पालन मात्र केले.

सोमवारपासून वाईन शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामानी दारु दुकानांबाहेर हजेरी लावली. सकाळी दहा वाजता आठवडा बाजार येथील एका वाईन शॉप बाहेर शेकडो तळीरामानी लाईन लावली. यावेळी 3 फुटाचे अंतर सोडून नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. दुकान बंद मात्र दुकांनाबाहेर तोबा गर्दी असे सकाळी चित्र होते.

Related Stories

कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

NIKHIL_N

आता कोणीही, कितीही विरोध केला तरी रिफायनरी होणार!

Patil_p

दापोली- कुडावळे येथे आज राज्यातील पहिली कृषी ग्रामसभा

Kalyani Amanagi

कणकवली, सावंतवाडी, कुडाळला ऑक्सिजन प्लान्ट

NIKHIL_N

दापोलीत तीन महिलांचा जळून मृत्यू

Abhijeet Khandekar

फणसवणे वनेवाडी येथील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

Archana Banage