Tarun Bharat

तळीरामांना मिळणार घरबसल्या दारु

Advertisements

प्रतिनिधी/रत्नागिरी

दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बंद राहिलेली दारुची दुकाने उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु मद्यपींना दारु दुकानात दारु मिळणार नसून घर बसल्या दारु मिळणार आहे. यासाठी प्रशासन गुगल लिंक, व्हाट्स अँप आणि फोन कॉल द्वारे ऑर्डर घेऊन घरपोच मद्य पोचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज काढले आहेत. परवानाधारक दुकानांमधून च ऑनलाइन घरपोच सेवा देण्यात येईल.

लॉक डाऊनच्या काळात तब्बल 40 दिवसांपेक्षा अधिक काळ मद्याची दुकाने बंद राहिली. नुकताच राज्य शासनाने मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. परंतु अनेक जिल्ह्यात दारु दुकानांवर मोठी गर्दी झाली. यामुळे जिल्ह्यात अद्याप दारुची दुकाने उघडली नव्हती. परंतु आता मद्यपींची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री सुरू करण्याची परवानगी दिली आहे.. यासाठी गुगल लिंक, व्हाट्स अँप आणि फोन कॉल वर ऑर्डर घेऊन मद्य थेट मद्यपींपर्यंत पोहचवले जाणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Related Stories

‘थ्री एम’च्या व्यवस्थापकासह बसचालक, ठेकेदारावर गुन्हा!

Patil_p

दापोली तालुक्यातील गिम्हवणेतील बेपत्ता उमेदवार मतदानाला हजर

Archana Banage

बचतगटाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणार – आ. योगेश कदम

Archana Banage

उभरती कलाकार सेजल कदमची अकाली ‘एक्झीट’

Patil_p

शहडोल : ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

मी सत्यच बोललो; संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

Archana Banage
error: Content is protected !!