Tarun Bharat

तहसिलदार कार्यालयाने घेतला मोकळा श्वास

प्रतिनिधी/ सातारा

गेले अनेक वर्षापासून पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलेल्या सातारा तहसिलदार कार्यालयात सोमवारी नो पार्किंग झोन लागू झाला. दोन दिवसापासून वाहनधारक या नियमांचे पालन करत आहेत. यामुळे तहसिलदार कार्यालयाने मोकळा श्वास घेतला आहे.

       सातारा तहसिलदार कार्यालयात नियोजनाअभावी पार्किंगची समस्या भेडसवत होती. कार्यालयात शहरातून तसेच ग्रामीण भागातून दररोज हजारो लोक कामानिमित्त येत असतात. यावेळी दुचाकी, चारचाकी वाहने अस्थावस्थ पद्धतीने उभी करण्यात येत होती. यामुळे कार्यालयातील रस्ते अरुंद झाले होते. यांचा नाहक त्रास इतर वाहन धारकांना सोसावा लागत होता. कार्यालयातील अधिकायांच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहने उभी करण्यात येत होती. काही दिवसांनी ही समस्या आणखी गंभीर होऊ नये म्हणून नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय तहसिलदार आशा होळकर व प्रांतधिकारी मिनाज मुल्ला यांनी घेतला. यांची अंमलबजावणी सोमवार पासून सुरु झाली. याच पार्श्वभूमी दोन दिवसापासून वाहनधारकांनी कार्यालयाच्या बाहेरील आवारात गाडय़ा पार्किंग केल्या आहेत. फक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. यामुळे कार्यालयाने मोकळा श्वास घेतला. 

Related Stories

सोलापुरात आज तब्बल 103 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण

Archana Banage

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार

Archana Banage

मोडलेले लग्न जमवले पोलिसांनी

tarunbharat

राजधानीत ‘शिवजयंती’ होणार साध्या पद्धतीने साजरी

Amit Kulkarni

सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ मंदावली

datta jadhav