Tarun Bharat

तहानलेल्या माकडाची पाण्यासाठी भटकंती

वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याची नितान्त गरज

प्रतिनिधी / मिरज

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला असताना उष्णतेचा उच्चाक गाठला आहे. अशा परिस्थितीत माणसाप्रमाणे मुक्या जनावरांच्याही घशाला कोरड पडत आहे. शहरातील किल्ला भाग येथे बांधकाम विभाग कार्यालयात मंगळवारी एक माकड पाण्यासाठी तडफडत होते. मोकळ्या पडलेल्या पाईपलाईनमध्ये पाण्याचा शोध घेत होते. घोटभर पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या माकडाचे दृश्य टिपले दैनिक तरुण भारतचे छायाचित्रकार युवराज सोनवणे यांनी.

दुपारची वेळ होती. आग ओकणाऱ्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. किल्ला भागाचा परिसर म्हणजे निसर्ग संपन्न परिसर बांधकाम विभाग कार्यालयाच्या भोवताली अनेक मोठी झाडे आहेत. या झाडांवरच माकडांचा घोळका बसला होता. यातील एक माकड तहानलेले होते. पाण्यासाठी ते झाडावरून खाली आले. पण परिसरात कोठेच पाणी नव्हते.

बांधकाम कार्यालय परिसरात सडा मारण्यासाठी बोअरवेलला जोडलेली एक पाईप होती. पाण्यासाठी भटकणाऱ्या या माकडाला पाण्याची पाईप निदर्शनास आली. ही पाईप बोअरला जोडली होती. माकडाने ही पाईप उचलून तोंडाला लावली. पण पाणी नव्हते. तरीही माकडाने प्रयत्न सोडले नाहीत. वारंवार पाईप उचलून तोंडाला लावून पाणी येतंय का ? याची प्रतीक्षा करीत होते. शेवटपर्यंत पाणी न आल्याने सदर माकड पुन्हा झाडावर जाऊन बसले.

वाढत्या तापमानामुळे माणसांप्रमाणे जनावरांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन वन्यप्राण्यासाठी पाण्याची सोय करण्याची गरज आहे. आपल्या घरा बाहेरील अंगणात, छतावर पाणी आणि खाद्य पदार्थ ठेवावे, अशी मागणी प्राणी मित्रांकडून जोर धरू लागली आहे.

Related Stories

मिरजेत गाडी विक्रीच्या अमिषाने सव्वा लाखांची फसवणूक

Archana Banage

Sangli; कर्ज बाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या, बसर्गी येथील घटना

Abhijeet Khandekar

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Archana Banage

सांगली : कुपवाड एमआयडीसीत ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरले; एक ठार, एक जखमी

Archana Banage

पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात

Archana Banage

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करा

Archana Banage