Tarun Bharat

तांत्रिक समस्येमुळे शिक्षकांचे पगार अडकले

डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप नाही : हय़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडथळा

प्रतिनिधी /बेळगाव

तांत्रिक समस्येमुळे सरकारी शाळांच्या शिक्षकांना डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. हय़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शिक्षकांचे पगार जमा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वेळेत पगार न झाल्याने शिक्षकांचे हाल झाले आहेत. लवकर पगार जमा करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

बेळगाव व चिकोडी या शैक्षणिक जिल्हय़ात सरकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या 31 हजार इतकी आहे. प्रत्येक महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात येतो. यावेळी मात्र 20 तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेला नाही. यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.

2020-21 या शैक्षणिक वर्षात काही शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. नवीन नेमणूक केलेल्या शिक्षकांसंबंधीच्या माहितीचा योग्यप्रकारे समावेश झालेला नाही. सरकारने सर्व नोकरवर्गाचे वेतन खजाने-2 द्वारे देण्याचे ठरविले आहे. एचआरएमएस सॉफ्टवेअर ‘खजाने-2’ ला जोडताना समस्या येत आहेत. या तांत्रिक कारणामुळे वेतन होण्यास विलंब होत आहे. बेळगाव शहरातील 14 क्लस्टरपैकी केवळ 2 क्लस्टरमधील शिक्षकांचे पगार झाले आहेत.

शिक्षकवर्गात असमाधान

2021-22 या आर्थिक वर्षात सर्व विभागांनी आपल्या नोकरवर्गाचे वेतन खजाने-2 द्वारे जोडण्याचे काम सुरू केले आहे. परंतु शिक्षण विभागाने शिक्षकांचा सेवा कालावधी, बँक खाते क्रमांक, आधारकार्ड क्रमांक व इतर माहिती अद्याप नमूद केलेली नाही. ही माहिती अद्याप अपूर्ण असल्यामुळेच खजाने-2 सॉफ्टवेअरला माहिती जोडताना अडचणी येत आहेत. यामुळेच शिक्षकांना बढती व इतर सुविधा मिळालेल्या नाहीत. वरि÷ अधिकाऱयांना हे लक्षात आणून देऊनही याचा उपयोग झाला नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.

जिल्हय़ातील प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांची माहिती

शैक्षणिक जिल्हाशाळाशिक्षक
बेळगाव239012000
चिकोडी300019000

लवकरच वेतन देण्याची सूचना

एचआरएमएसला खजाने-2 जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिक्षण विभाग व इतर नोकरवर्गाचे वेतन मिळालेले नाही. या समस्येची दखल घेण्यात आली असून लवकरच वेतन देण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी माध्यमांना दिली.

-जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ

Related Stories

चार महिने पूर्ण, तरीही सर्व्हरची समस्या जैसे थे

Amit Kulkarni

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Omkar B

संस्कारी पिढीसाठी मराठी भाषा प्रभावी माध्यम

Amit Kulkarni

व्यापार, उद्योग, रोजगाराला प्राधान्य

Amit Kulkarni

सरकारविरोधात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

Omkar B

उन्नतीतर्फे संक्रांतीनिमित्त विक्री मेळावा

Patil_p