Tarun Bharat

तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटा लाकडी चमचा

Advertisements

तृण कलाकार (ग्रास आर्टिस्ट) अभिषेक चौहान यांनी गेल्या 20 वर्षांत छोटय़ातील छोटय़ा वस्तू बनविण्याच्या अनेक करामती केल्या आहेत. पण त्यांची नवी करामत अफलातूनच आहे. त्यांनी चक्क तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान असा लाकडी चमचा बनविला आहे. या चमच्याची लांबी अवघी 3 मिलीमीटर आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम 3.9 मिलीमीटर चमच्याचा होता. तो या करामतीने मोडला जाणार आहे. अभिषेक चौहान हे पंजाबचे असून त्यांचे नाव यापूर्वीच काहीवेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलेले आहे. यासाठी त्यांचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी सत्कारही केलेला आहे.

आश्चर्य म्हणजे हा चमचा बनविताना अभिषेक चौहान यांनी कोणत्याही भिंगाचा (ज्यातून वस्तू मोठी दिसू शकते) उपयोग केलेला नाही. केवळ साध्या डोळय़ांच्या साहाय्यानेच त्यांनी एवढी लहान वस्तू मोठय़ा कौशल्याने बनविली आहे. या त्यांच्या अभूतपूर्व कौशल्याचे श्रेय ते सनातन संस्कृतीला आणि धर्माला देतात, हे विशेष आहे. गवत किंवा लाकडापासून मोठय़ा वस्तू आपण डोळे बांधूनही तयार करू शकतो, असे त्यांचे प्रतिपादन आहे. त्यामुळे हा लहानात लहान चमचा तयार करताना आपल्याला कोणत्याही भिंगाचा वापर करावा लागला नाही, आपली दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून त्यासाठी आपण विविध प्रकारचे योग व्यायाम करत असतो, असे त्यांचे म्हणणे आहे. पहाटे उठणे आणि दोन तास एकाग्र चित्ताने ध्यान करणे यामुळे चित्त एकाग्र करण्याची क्षमता मोठय़ा प्रमाणात आहे, असे ते म्हणतात.

Related Stories

जगभ्रमंती करणारा सर्वात तरुण वैमानिक

Amit Kulkarni

दहशतीची सावली…

Amit Kulkarni

स्मार्टफोनमुळे पालकांची होते चिडचिड

Amit Kulkarni

पुणे : नारळी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात कल्पवृक्षाची साधेपणाने सजावट

Tousif Mujawar

जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी राज्यस्तरीय ‘योगयज्ञ’

Tousif Mujawar

भावी जावयाचे अनोखे आदरातिथ्य

Patil_p
error: Content is protected !!