Tarun Bharat

कोरोना : तांबवेकरांना मोठा दिलासा ; 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Advertisements

कराड /प्रतिनिधी

   कृष्णा हॉस्पिटल मधील त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 54 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 
कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आलेल्या कोविडी-19 बाधीताच्या संपर्कात आलेल्या 41 पुरुष व 13 महिलांचे असे एकूण 54 अनुमानितांचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

सातारा जिल्ह्यातील 21 मार्च रोजी अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या 27 वर्षीय युवकाला सर्दी असल्याने शासकीय रुग्णालयात व 31 वर्षीय पुरुषाला श्वसन संस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग असल्यामुळे दि. 3 एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात अनुमानित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय.व्ही.पुणे पाठविण्यात आला आहे.

Related Stories

मुगळीच्या युवकाकडून गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त

Abhijeet Shinde

कोरोना संपवायचाय अन जगायचंय पण..

Patil_p

जावलीत कोरोनाचा पुन्हा वाढतोय प्रादुर्भाव

Omkar B

उदयनराजे उवाच

Patil_p

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे विधी पंडित पदवीने सन्मानित

Abhijeet Shinde

वाईचा ब्रिटिश कालीन कृष्णापूल होणार नामशेष, नविन पुलास मंजुरी – आमदार पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!