Tarun Bharat

तांब्याच्या तारा चोरणारे अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी./ सातारा

सातारा आणि वाई तालुक्यातील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून तांब्याच्या तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातील सहा गुह्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करंजे नाका येथे ताब्यात घेतलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिक्रमण विजय काळे (वय 30 वर्षे रा. रेवडी ता. कोरेगाव),  आकाश प्रकाश भोसले (वय 32 वर्षे रा. मर्ढे ता. जि सातारा) यांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 80 हजार 800 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱयाद्वारे माहिती मिळाली की, तांबे चोरीतील गुन्हेगार करंजे नाका परिसरात येणार आहेत. त्यावरून त्यांनी एक पथक तयार केले आणि सापळा रचून अतिक्रमण काळे, आकाश भोसले या दोघांना ताब्यात घेतले. अतिक्रमण हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याने गेल्या चार वर्षात वाई, सातारा तालुक्यात सहा ठिकणी तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्या दोघांकडून 226 किलोच्या 1 लाख 80 हजार 800 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या सुचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत एपीआय रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, आतिष घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अजित कर्णे, गणेश कापरे, प्रवीण कांबळे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे यांचा सहभाग होता.

Related Stories

नितीन गडकरी म्हणजे Man Of Commitment- धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

राष्ट्रवादीतर्फे शशिकांत शिंदे यांची उमेदवारी फायनल

Patil_p

भाजप जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार

datta jadhav

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 10 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

सातारा जिल्ह्यातील 346 कोरोना बाधित ; तर 9 मृत्यू

Archana Banage

“राज्यपालांविरोधात कोर्टात जावं लागणं हे आमच्या घटनेचं दुर्दैवं”

Archana Banage