Tarun Bharat

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; एकाला अटक

ऑनलाईन टीम / आग्रा : 


भारताची शान आणि आग्रा येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याचे आग्र्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती फोनवर मिळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर ताजमहाल परिसरात जाण्याचे मार्ग देखील बंद करण्यात आले होते. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे.


मात्र ताजमहालमध्ये स्फोटके ठेवल्याची माहिती खोटी असल्याची माहिती आग्र्याचे पोलीस महानिरीक्षक ए सतीश गणेश यांनी दिली. फिरोजाबाद येथील एका व्यक्तीने फोन करुन ही खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात मोठ्या प्रमाणात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले. आता संपूर्ण ताजमहालमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


आग्राच्या लोहमंडी पोलिस ठाण्यात यूपी पोलिसांना ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. आग्रा येथील प्रोटोकॉल एसपी शिवराम यादव म्हणाले की, ज्याने फोनवरून बॉम्बची माहिती दिली तो तरुण फिरोजाबादचा रहिवासी आहे आणि सैन्य भरती रद्द केल्याबद्दल त्याला राग होता. शिवराम यादव म्हणाले की, फोन कॉलनंतर पोलिसांनी नंबर ट्रेस केला असता त्या युवकाला शोधून ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नव्हे मंत्र : अमिताभ बच्चन

tarunbharat

दिलासा! रशियातून ‘स्पुटनिक व्ही’ लसीची पहिली खेप भारतात दाखल

Tousif Mujawar

न्यायालय अवमानना 6 जणांना अटक

Patil_p

नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Archana Banage

‘या’ राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला वाटतोय क्रॉस व्होटिंग चा धोका

Kalyani Amanagi

मार्क्‍सवादी क्रांतिकारक चे गवेरा यांचे घर विक्रीसाठी खुले

datta jadhav