Tarun Bharat

ताणतणाव, कौटुंबिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन

नेचर कौन्सिलिंग आणि हिलिंग सेंटरमध्ये सेवा उपलब्ध

बेळगाव   

नेचर कौन्सिलिंग आणि हिलिंग सेंटर हे गेल्या 5 वर्षांपासून बेळगाव येथे कार्यरत आहे. मानसिक समस्या आणि आजारांवर अविरत सेवा देत असून ही संस्था फक्त बेळगावकरांचे नाहीतर आजुबाजूच्या अनेक राज्यांसाठी वरदान ठरले आहे. येथे येऊन अनेक मानसिक समस्या असणारे लोक पूर्णपणे बरे होऊन आज आपले जीवन यशस्वीरित्या जगत आहेत. हे फक्त त्यांच्यासाठी फायद्याचे नसून त्यांच्या कुटुंबीयासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे.

या सेंटरमध्ये लहान आणि प्रौढ यांच्या अनेक वेगवेगळय़ा मानसिक समस्या आणि आजारांवर विनाऔषध उपचार होतो. येथे मानसिक आजाराव्यतिरिक्त कौटुंबिक समस्या, ताणतणाव, न्यूनगंड, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध आहेत. मानसिक आजार आणि समस्या या वेगवेगण्य़ा प्रकारच्या असतात. दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळय़ा परिस्थितीला आणि लोकांना सामोरे जात असतो. पण त्याच परिस्थितीला हाताळताना आपल्या मानसिक गरजा आणि स्वास्थ्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. आणि अशाच प्रकारे या आजाराची सुरुवात होते.

या आजाराची लक्षणे इतर शारीरिक आजारांपेक्षा वेगळी असतात. म्हणूनच आपण सुरुवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. हीच आपली सगळय़ात मोठी चूक असते. मानसिक आजाराची लक्षणे कशी समजून घ्यावी, अशा आजारांची लक्षणे आपल्याला मानसाच्या बदलेल्या वागणुकीमधून कळते. उदाहरणार्थ –

1) एकटेपणा जाणवणे, 2) सतत शांत बसणे- बोलणे कमी करणे 3) सतत भीती वाटणे 4) नेहमी दुःखाची भावना दाटून येणे 5) भावनांचा उद्रेक-भडका होणे 6) संशय घेणे 7) सतत आत्महत्येचे विचार येणे

असे विचार आपणा सर्वांनाच येतात पण क्वचित. नेहमी नाही पण असे विचार नेहमी मनात येणे आणि दुःखी होणे म्हणजे आपण समजून जावे की आपल्याला मानसिक उपचाराची गरज आहे. अशावेळी वेळ न दवडता त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि उपचाराचा सुरुवात करावी.

आजाराच्या सुरुवातीलाच जर आपण व्यवस्थित उपचार घेतले तर हे आजार नक्कीच बरे होऊ शकतात आणि सुरुवातीच्या काळात जर आपण मानसोपचार तज्ञांकडून उपचार केला तर विना औषध तुम्ही बरे होऊ शकता आणि ती सेवा तुम्हाला बेळगावमध्ये नेचर कौन्सिलिंग आणि हिलिंग सेंटरमध्ये मिळते.

Related Stories

दीड दिवसाच्या श्री विसर्जनासाठी फिरत्या वाहनांची सोय

Amit Kulkarni

बसचालक, वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Patil_p

विकासाचे गाजर मराठी भाषिकांच्या मुळावर

Amit Kulkarni

शिवाजी हुरुडे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप

Amit Kulkarni

कोविड-19 व डोळय़ांचे विकार

Patil_p

समाज जीवनातील सत्तांधाचे रूप म्हणजे हत्ती!

Patil_p
error: Content is protected !!