Tarun Bharat

तात्काळ किव्ह सोडा; भारतीय दुतावासाची ॲडवायजरी जारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील सहा दिवसांपासून युद्ध सुरू असून, या युद्धाची धग आता तीव्र झाली आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हमध्ये रशियन सैन्य अधिक आक्रमकपणे हल्ला चढवत आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाने युक्रेनवर 56 रॉकेट आणि 156 क्षेपणास्त्र डागले. तेथील युद्धाची दाहकता पाहता भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ॲडवायजरी जारी करण्यात आली आहे. मिळेल त्या माध्यमातून आजच्या आज किव्ह शहर सोडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून प्रयत्न सुरु आहेत. रशियन क्षेपणास्त्रे आता युक्रेनमधील मोठय़ा प्रकल्पांवर, किर्णोत्सर्जन करणाऱ्या वस्तूंचे विघटन करणारी ठिकाणे, उड्डाणपूल, पाण्याच्या साठय़ांवर आणि किव्ह तसेच खार्कीव्हमधील रहिवाशी ठिकाणांवर हल्ला करत आहेत, असं संयुक्त राष्ट्रांमधील युक्रेनच्या राजदूतांनी म्हटलं आहे. त्यानंतर युद्धाची दाहकता पाहून किव्हमध्ये अडकलेल्या भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांना तातडीने मिळेल त्या वाहनांद्वारे किव्ह सोडण्याची सूचना केली आहे.

Related Stories

लॉकडाऊनचा निर्णय १२ मे रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर : मुख्यमंत्री

Archana Banage

भारताचे यश जगाला प्रेरणा देईलभारताचे यश जगाला प्रेरणा देईल

Patil_p

नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार संकटात

Patil_p

भाजपाच्या सुमन भंडारे पंचायत समितीच्या सभापती

Abhijeet Khandekar

देशात 34,703 नवे बाधित

datta jadhav

पाय नाहीत, निर्धाराचे पंख आहेत

Patil_p