Tarun Bharat

ताथवडा घाटात जबरी चोरी

Advertisements

वार्ताहर/ बिबी

फलटण पुसेगाव रोडवर ताथवडा घाटात 4 अज्ञात इसमांनी महिंद्रा पिकअप गाडीला अडवून जबरी चोरी केली आहे. यामध्ये महिंद्रा पिकअपसह आतमध्ये असणारी गायछापची 15 पोती व 25 नारळाची पोती, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 27 हजाराचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेला आहे.                                

   याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार  दि. 18 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अक्षय भगवान निर्मल (रा. निढळ ता खटाव जि.सातारा) हे पुसेगाववरुन फलटणकडे येत होते. ताथवडा घाटात त्यांचा एका दुचाकीस्वाराने पाठलाग केला. ते ताथवडा घाटातील शेवटच्या वळणावर आले असता तेथे त्यांच्या पिकअप समोर तीन जणांनी आकाशी रंगाची मारुती कार आडवी लावली. यानंतर पिकमध्ये क्लीनर बाजूने चढून निर्मल यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम व पाच लाख रुपये किंमतीची एम एच 11 सी एच 7775 क्रमांकाची महिंद्रा कंपनीची प्याक बॉडी पिकअप, एक लाख 3 हजार 500 रुपये किमतीचे प्रत्येकी 20 पुडे असलेली गायछाप तंबाखूची 15 पोती, प्रत्येकी 50 नारळ असलेली 25 नारळाची पोती, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा एकुण सहा लाख 27 हजार 250 किमतीचा चोरुन नेला.

या घटनेची फिर्याद अक्षय निर्मल यांनी दिली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु एस शेख हे करीत आहेत.

Related Stories

विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली- उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

गौणखनिज वाहतूक प्रकरणी महसूल विभागाची कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाने दोन बळी, नवे रूग्ण २३

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Rohan_P

राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार

Abhijeet Shinde

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटी; वाहतूक विस्कळीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!