Tarun Bharat

तानाजी गल्ली-बसवण कुडचीतील नागरिकांनी केल्या गटारी साफ

Advertisements

मनपाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना राबवला उपक्रम

वार्ताहर / सांबरा

तानाजी गल्ली, बसवण कुडची येथील गटारी साफ करण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने शिवशक्ती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि गल्लीतील नागरिकांनी मिळून गटारी स्वच्छ केल्या.

महानगरपालिकेने गल्लीतील गटारी गेल्या कित्येक दिवसापासून स्वच्छ केल्या नसल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. नगरसेविका निवडून आल्या तेव्हापासून गावात एकदाही फिरकल्या नाहीत. अधिकाऱयांना वारंवार सांगूनसुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांनीच गटारी स्वच्छ केल्या. गटारी तुंबलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहात आहे. यावेळी जोतिबा हम्मन्नवर, दिनेश रवळुचे, नंदू चौगुला, महेश सावकार, किसन एकणेकर, रघू पाटील, संदेश रवळुचे, विजय सावकार, प्रवीण गौंडाडकर, कोमल लक्ष्मण्णावर, वृषभ मुनवळी आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

लोंढा वन अधिकाऱयाकडून बाबुराव देसाईंना पिस्तूलचा धाक

Amit Kulkarni

शेतकरी संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

Nilkanth Sonar

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा बचावला पण आई दगावली..!

Nilkanth Sonar

संशयित कोरोनाबाधितांवरही उपचार करणे बंधनकारक

Patil_p

वरेरकर नाटय़ संघाच्या प्रदर्शनाला रसिकांचा प्रतिसाद

Amit Kulkarni

हब्बनहट्टी गावाजवळ रस्त्यावर सापडली पाचशे रुपयाची नोट

Patil_p
error: Content is protected !!