Tarun Bharat

तान्हुल्या मुलीच्या पाठीवर लिहिले नाव अन् संपर्क क्रमांक

Advertisements

युक्रेन युद्धाचे मार्मिक छायाचित्र ः आईला मारले जाण्याची भीती

युक्रेनमधून एक काळीजाला पिळवटून टाकणारे छायाचित्र समोर आले आहे. छायाचित्रात डायपर घातलेली एक चिमुरडी उभी असून तिचे नाव वेरा मकोवी आहे. तिच्या पाठीवर तिचे नाव, फोन क्रमांक लिहिलेला आहे. हे सर्व काही तिची आई साशा मकोवी यांनी लिहिले आहे. आपण रशियाच्या हल्ल्यात मारले गेलो तर  वेराची ओळख पटावी, मुलीला कुणाच्या हवाली करावे हे कळावे, म्हणून तिच्या आईने हे कृत्य केले आहे.

हे छायाचित्र कीव्हच्या मुक्त पत्रकार अनास्तासिया लॅपटिना यांनी ट्विट केले आहे. युक्रेनियन माता स्वतःच्या मुलांच्या शरीरावर कुटुंबाचा संपर्क क्रमांक लिहित आहेत. आपण मारले गेलो आणि मुले वाचली तर त्यांना योग्य ठिकाणी पोहोचविले जावे म्हणून हे केले जात असल्याचे अनास्तासिया यांनी म्हटले आहे.

साशा यांनी तीन दिवसांपूर्वी स्वतःच्या मुलीचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. लॅपटिना यांनी ट्विटरवर साशा यांच्या पोस्टचा उल्लेख केला आहे.  साशा पोस्टमध्ये जगासमोर स्वतःचे दुःख व्यक्त करत आहे. युद्ध सुरू होताच मुलगी वेराच्या पाठीवर आणि एका कागदाच्या तुकडय़ावर सर्वकाही लिहिले होते असे साशा यांनी म्हटले होते.

एक आठवडय़ापूर्वीच युक्रेनच्या जपोरिजिया येथून आईमुलाची एक अशीच मनाला हादरे देणारी कहाणी समोर आली होती. 11 वर्षीय मुलगा हसन पिसेकाला वाचविण्यासाठी जूलिया यांनी त्याला स्वतःपासून दूर अन्य देशात पाठविणेच योग्य समजले. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलाला पासपोर्ट देत रेल्वेत बसविले आणि त्याच्या हातावर नातेवाईकांचा मोबाइल क्रमांक लिहिला. हसन पिसेका एकटय़ाने रेल्वेमधून 1 हजार किमीचे अंतर कापून स्लोवाकियात पोहोचला होता.

Related Stories

आता ब्रिटनमध्येही 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण

datta jadhav

विमानाच्या पेटत्या इंजिनचा थरार; अन् पालटकडून इमर्जन्सी लँडिंग

datta jadhav

कोरोना विरोधात लसीकरण हेच प्रभावी अस्त्र

Amit Kulkarni

शस्त्रास्त्रांसोबत खेळते 8 वर्षीय मुलगी

Patil_p

ऑक्सफोर्डची लस देण्यास ब्रिटनमध्ये प्रारंभ

Patil_p

पुतीन यांच्या विरोधात रशियामध्ये निदर्शने

Amit Kulkarni
error: Content is protected !!