Tarun Bharat

तामजाईनगर येथे भारतीय बैल बेडकाचे दर्शन

प्रतिनिधी/ सातारा

बुधवारी सकाळी तामजाईनगर परिसरात मोकळया मैदानात बेडकाचे डराव डराव ऐकून सर्वच जण अवाक झाले. वेगळय़ा प्रजातीचा बेडूक असल्याने जो तो त्या बेडकाकडेच पहात होता. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. धिरज घोरपडे यांनी या बेडकाबाबत माहिती घेतली असता राणा टिग्रीना अर्थात भारतीय बैल बेडूक म्हणून या बेडकाला ओळखले जाते. या बेडकाचे दर्शन तब्बल अकरा वर्षानंतर झाल्याचे सांगण्यात आले.

तामजाईनगर येथील बुधवारी दर्शन झालेल्या भारतीय बैल बेडकाबाबत पोदार स्कूलचे जाधव म्हणाले, राणा टिग्रीना नावाचा बेडूक हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा बेडूक आहे. त्याला भारतीय बैल बेडूक म्हणतात. राणा टिग्रीना सामान्यतः स्थिर मऊ पाण्यामध्ये आणि खड्डे, तलाव, झरे, नद्या इत्यादी हळू वाहणाऱया पाण्याच्या परिसरात आढळतात. पावसाळ्यात ते शेतात, बागेमध्ये, रस्ता इत्यादीपासून आपल्या घरापासून बरेच दूर जातात. पाण्यात ते त्वचेला ओलसर ठेवतात ते पाण्याजवळ राहतात कारण जर त्यांची त्वचा कोरडी होण्यास सुरूवात झाली असेल तर ते त्वरित पाण्यात जाऊन ते ओलसर ठेवू शकतात कारण त्यांची त्वचा ओलसर झाल्यावर ती निसरडे राहते, जेणेकरून आवश्यकतेनुसार ते शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यांचा आकार चपटा असतो. त्याचे शरीर डोके आणि सोंडेमध्ये विभागलेले आहे. अशा दुर्मिळ बेडकाचे दर्शन झाल्याने सातारकरांनी कुतूहूलाने पाहिले.

Related Stories

कोविशिल्ड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल!

Tousif Mujawar

चांदीची गदा पेलणारा 95 वर्षांचा मोही चा अवलिया

Patil_p

वाई शहरात कडक टाळेबंदी

Patil_p

आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

Archana Banage

अवकाळीने सातारकर वैतागले

Patil_p

अडचणीतील भाजपाला बापटांमुळे संजीवनी मिळणार का?

datta jadhav