Tarun Bharat

तामिळनाडूच्या अनेक लक्षवेधी लढती

Advertisements

तामिळनाडूत प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून प्रत्येकाची नजर आता 6 एप्रिल रोजी होणाऱया मतदानावर आहे. राज्यात अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी सत्ता टिकविण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावत आहे. तर द्रमुक-काँग्रेस आघाडीकडून चुरशीची लढत दिली जात आहे. तामिळनाडूतील काही मतदारसंघांमधील लढतींवर सर्वांची नजर लागून राहिली आहे. कोविलपट्टी येथून टीटीव्ही दिनाकरन, बोडिनयाकानूर मतदारसंघात ओ. पन्नीरसेल्वम निवडणूक लढवत आहेत.

1 कोइम्बतूर दक्षिण

तामिळनाडूच्या या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. येथे मक्कल निधि मय्यम (एमएनएम)चे अध्यक्ष कमल हासन यंदा उभे राहिले असून त्यांचा राजकीय प्रवास तितकासा सोपा ठरणार नाही. भाजपने येथे वनाथी श्रीनिवास यांनी उमेदवारी दिली आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रमुख वनाथी स्थानिक स्तरावर मोठय़ा नेत्या असून त्यांना चांगले समर्थनही प्राप्त आहे. अशा स्थितीत येथील लढत अत्यंत रंजक होणार आहे. काँग्रेसकडून मयूर जयकुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

2 कोलाथूर

द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन येथून निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ अत्यंत विशेष ठरला आहे. मागील 3 निवडणुकांमध्ये स्टॅलिन यांना येथून विजय मिळाला आहे. पण स्टॅलिन यंदा प्रथमच स्वतःचे वडिल एम. करुणानिधी यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंतच्या मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये द्रमुक आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत हा मतदारसंघ भावी मुख्यमंत्र्यांचा ठरू शकतो.

3 ईडापड्डी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते के. पलानिसामी यांचा हा मतदारसंघ आहे. याचमुळे या मतदारसंघावर प्रत्येकाची नजर लागून राहिली आहे. पलानिसामी यंदा येथून विजयी झाल्यास त्यांची हॅटट्रिक होणार आहे. तामिळनाडूचा हा पश्चिम भाग अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला मानण्यात येतो. अशा स्थितीत पक्षाला येथून मोठय़ा विजयाची अपेक्षा आहे. द्रमुकचे संबत कुमार यांचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

4 चेपॉक

चेपॉकचे नाव क्रिकेटच्या मैदानामुळे ओळखीचे असेल. पण निवडणुकीच्या आखाडय़ात हा मतदारसंघ यंदा विशेष लक्ष वेधून घेत आहे. द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधि येथून निवडणूक लढवत आहेत. उदयनिधिंची विधाने असो किंवा अण्णाद्रमुक-भाजपकडून त्यांच्यावर होणारी टीका पाहता हा मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. पीएमकेचे ए. कसाली यांच्याकडून उदयनिधिंना तीव्र आव्हान दिले जात आहे.

5 थाउजंड लाइट्स

हा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत विशेष आहे, कारण भाजपने येथे प्रख्यात अभिनेक्षी खुशबू सुंदर यांना उमेदवारी दिली आहे. खुशबू सुंदर पूर्वी काँग्रेस-द्रमुकमध्ये राहिल्या होत्या. पण त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. भाजपच्या उमेदवार असलेल्या खुशबू यांना द्रमुकच्या एन. एझिहन यांचे आव्हान पेलावे लागणार आहे.

Related Stories

मध्यप्रदेश : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश सारंग यांचे मुंबईत निधन

Rohan_P

हैदराबादमध्ये आणखीन 4 मुलींवर बलात्कार

Patil_p

मोठी बातमी ! यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या बंद पडलेल्या सेवा पुन्हा सुरू

Abhijeet Shinde

‘या’ अभिनेत्रीच्या आठवणीत गुगलचे खास डूडल ; सहाव्या वर्षी मिळवला होता ऑस्कर

Abhijeet Shinde

‘हिजाब’वर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निर्णय

Amit Kulkarni

पाकिस्तानचा ‘नापाक’ कट व्यर्थ

Patil_p
error: Content is protected !!