Tarun Bharat

लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; सीडीएस बिपीन रावत जखमी

ऑनलाईन टीम / तमीळनाडू

तामिळनाडूतील कुन्नुर येथे लष्कराचे एम आय 17 व्ही 5 या प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये सरलष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटूंबीय प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. सरलष्कर प्रमुख रावत वेलिंग्टनहून दिल्लीला परतत असताना दुपारी १२.४० च्या दरम्यान ही घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेतील हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी ही प्रवास करत होत्या याच बरोबर आणखी १४ उच्च स्तरीय अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घडलेली दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होता की आजूबाजूला आगीच्या ज्वाला दिसत होत्या. एएनआय प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या अपघाताच्या ठिकाणी सापडलेले मृतदेह सापडले असुन जखमींना उपाचारासाठी तामिळनाडूमधील वेलिंग्टन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवले आहेत.

Related Stories

निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

Patil_p

obc reservation: काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं; चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला

Archana Banage

पहिल्या टप्प्यात 54 टक्के मतदान

Omkar B

फडणवीसांचा विधानभवनात मविआला धक्का, म्हणाले ‘त्या’ अदृश्य हातांचेही आभार

datta jadhav

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निमगाव (ह) येथील आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

Archana Banage

संपादकीय स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण ः ब्रिटन सरकार

Patil_p